TRENDING:

Immunization : 10 नोव्हेंबर - जागतिक लसीकरण दिन, जाणून घ्या या दिवसाचं महत्त्व

Last Updated:

लसीकरण केवळ व्यक्तीचंच नाही तर समाजाचंही संरक्षण करतं. कारण जेव्हा अधिकाधिक लोक लसीकरण करतात तेव्हा herd immunity विकसित होते, herd म्हणजे कळप. मोठ्या प्रमाणात लसीकरण झाल्यानं, रोगांचा प्रसार थांबतो. म्हणूनच, लसीकरण केवळ व्यक्तीसाठीच नाही तर संपूर्ण समाजासाठी आवश्यक आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : आज दहा नोव्हेंबर...हा दिवस लसीकरणाबद्दल जनजागृती करण्यासाठी अत्यंत महत्तवाचा. जागतिक लसीकरण दिनानिमित्त जगभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. या दिवसाचा उद्देश लसीकरणाच्या महत्त्वाबद्दल जागरूकता निर्माण करणं हा आहे. लसीकरणामुळे आपल्या शरीराचं गंभीर आजारांपासून संरक्षण  होतं.
News18
News18
advertisement

लसीकरण केवळ व्यक्तीचंच नाही तर समाजाचंही संरक्षण करतं. कारण जेव्हा अधिकाधिक लोक लसीकरण करतात तेव्हा herd immunity विकसित होते, herd म्हणजे कळप. मोठ्या प्रमाणात लसीकरण झाल्यानं, रोगांचा प्रसार थांबतो. म्हणूनच, लसीकरण केवळ व्यक्तीसाठीच नाही तर संपूर्ण समाजासाठी आवश्यक आहे.

Coconut Oil : बहुगुणी नारळाचं तेल, त्वचा, दातांसाठीही उपयुक्त, कल्पतरुचे फायदे

advertisement

जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच (WHO) नं 2012 मधे जागतिक लसीकरण दिन सुरू केला. हा दिवस 1974 मधे सुरू झालेल्या Expanded Programme on Immunization (EPI) वर्धापन दिनानिमित्त साजरा केला जातो.

जगभरातील सर्व लोकांना, विशेषतः मुलांना जीवनरक्षक लसी मिळाव्यात हे या कार्यक्रमाचे उद्दिष्ट होतं. या उपक्रमामुळे कांजिण्यांसारखे धोकादायक आजार पूर्णपणे नष्ट झाले आहेत, तर पोलिओ आणि गोवर सारखे आजार नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.

advertisement

लसीकरणाचा इतिहास अठराव्या शतकाचा आहे, एडवर्ड जेनर यांनी देवी रोगाची लस शोधून काढली. हा शोध आधुनिक वैद्यकशास्त्रासाठी क्रांतिकारी ठरला. कालांतरानं, लसींनी धनुर्वात, घटसर्प, गोवर आणि अलिकडे कोविड-१९ सारख्या आजारांपासून लाखो लोकांचे जीव वाचवले आहेत.

Skin Care : हिवाळ्यात घ्या त्वचेची काळजी, ही पेयं करतील त्वचेची निगा

लसीकरण हा केवळ संसर्ग रोखण्याचा एक मार्ग नाही, तर भविष्यातील पिढ्यांसाठी सुरक्षित भविष्य सुनिश्चित करणारं एक पाऊल आहे. WHO च्या मते, दरवर्षी लाखो मुलांचे जीव केवळ लसीकरणामुळे वाचतात.

advertisement

लसी आरोग्य सेवा प्रणालींवरील भार कमी करतात कारण त्या रोग सुरू होण्यापूर्वीच रोखतात, ज्यामुळे आरोग्य सेवा अधिक कार्यक्षमतेनं कार्य करू शकतात.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोशल मीडियावरून सुचली कल्पना, बनवला भन्नाट मोबाईल बेल्ट, 7 लाख रुपयांची कमाई
सर्व पहा

एकेकाळी लसीकरण हे फक्त मुलांसाठीच मर्यादित मानलं जात होतं, पण आता लसीकरण प्रौढांसाठीही तितकंच महत्त्वाचं आहे. इन्फ्लूएंझा आणि टिटॅनस सारख्या आजारांविरुद्ध वेळोवेळी लसीकरण करणं प्रौढांसाठी तितकंच महत्त्वाचं आहे.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Immunization : 10 नोव्हेंबर - जागतिक लसीकरण दिन, जाणून घ्या या दिवसाचं महत्त्व
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल