TRENDING:

कॅन्सरचं आता काही खरं नाही! भारताने तयार केला बॅक्टेरिया, शरीरात कर्करोगाची वाट लावणार

Last Updated:

Bacteria to fight against cancer : कोलकाता येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च (IISER) च्या एका टीमने एक अनुकूल जीवाणू विकसित केला आहे जो रुग्णाच्या शरीरात कर्करोगाशी सुरक्षितपणे आणि प्रभावीपणे लढू शकतो

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी दिल्ली : कॅन्सर म्हणताच अनेकांना भीती वाटते. कॅन्सरवर तसे बरेच उपचार आहेत. पण तरी काही प्रकरणात उपचार केले तरी कॅन्सर बरा होत नाही आणि रुग्णाचा मृत्यू होतो. पण आता भारताने कॅन्सरवर एक मोठा शोध लावला आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च म्हणजे आयआयएसईआरने एक असा बॅक्टेरिया तयार केला आहे, जो रुग्णाच्या शरीरात कॅन्सरशी लढेल.
प्रतीकात्मक फोटो
प्रतीकात्मक फोटो
advertisement

कोलकाता येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च (IISER) च्या एका टीमने एक अनुकूल जीवाणू विकसित केला आहे जो रुग्णाच्या शरीरात कर्करोगाशी सुरक्षितपणे आणि प्रभावीपणे लढू शकतो, असं संस्थेने एका निवेदनात म्हटलं आहे. RESET म्हणजे रिप्रोग्रेमिंग द सपरेसिव एन्वायरमेन्ट ऑफ ट्युमर माइक्रोएन्वायरमेन्ट नावाचा हा प्रोग्राम कर्करोग उपचारांमध्ये येणाऱ्या सर्वात मोठ्या अडथळ्यांपैकी एकावर परिणामकारक आहे.

advertisement

Cancer : कॅन्सरमुळे गेलेले केस परत येतात का? तज्ज्ञ डॉक्टरांनी सांगितलं उपचारानंतर काय होतं

निवेदनात म्हटलं आहे, "कॅन्सर बहुतेकदा टी रेगुलेटरी सेल्स म्हणजे ट्रेग्स नावाच्या विशेष रोगप्रतिकारक पेशींच्या मागे लपतो, ज्यामुळे शरीराच्या नैसर्गिक संरक्षण प्रणालीवर परिणाम होतो. परिमामी इम्युनोथेरपी किंवा केमोथेरपी सारख्या मानक उपचारांचा प्रभाव कमी होतो.

IISER ची टीम लपलेले कॅन्सर ट्यूमर शोधण्यासाठी आणि त्याची क्रिया टाळण्यासाठी प्रोबायोटिक्स विकसित करत आहे, ज्यामुळे कर्करोगाविरुद्ध रोगप्रतिकारक शक्ती पुन्हा सक्रिय होते. सोप्या भाषेत सांगायचं तर, ते अनुकूल सूक्ष्मजीवांना जिवंत, लक्ष्यित औषधांमध्ये रूपांतरित करत आहेत जे एके दिवशी रुग्णाच्या शरीरात कार्य करू शकतात, ज्यामुळे कर्करोगाचा उपचार अधिक सुरक्षित आणि प्रभावी बनतो.

advertisement

Health Risk Of The Day : क्रिस्पी ब्रेड, चपाती, रोटी आवडते; मोठ्या धोक्याला देताय आमंत्रण! खाण्याआधी एक्सपर्ट काय सांगतात पाहा

या उपचारावर लक्ष ठेवण्यासाठी स्वतंत्र देखरेख प्रणालीही विकसित करण्यात आली आहे. ज्यामुळे उपचाराचा परिणाम काय आहे हे डॉक्टर पाहू शकतील. हा शोध लावणारी आयआयएसईआरचे 11 सदस्यांची टीम या वर्षी ऑक्टोबरमध्ये पॅरिसमध्ये होणाऱ्या जगातील सर्वात मोठ्या सिंथेटिक बायोलॉजी स्पर्धेत त्यांच्या संस्थेचं आणि भारताचं प्रतिनिधित्व करेल.

advertisement

शरीरात कसा पसरतो कॅन्सर?

आपल्या शरीरातील पेशी या एखाद्या सुरक्षा कवचाप्रमाणे कार्य करत असतात. अनेक आजारांशी या लढतात आणि आपल्या शरीराला निरोगी आणि सुदृढ ठेवतात. आपल्या शरीरात जवळपास 30 लाख कोटी पेशी असतात, ज्या एका पॅटर्नमध्ये वाढतात आणि ठराविक काळानंतर स्वतःच नष्ट होतात. या नष्ट झालेल्या पेशींची जागा नव्या पेशी घेतात. नव्या पेशी नष्ट झालेल्या पेशी खातात. यामुळे शरीराची स्वच्छता होत राहते.

advertisement

जर एखादी पेशी त्याच्या निर्धारित पॅटर्नच्या विरुद्ध जाऊन शरीराला अपाय करण्याचा प्रयत्न करत असेल, तर या नव्या पेशी त्यांना खाऊन नष्ट करतात. मात्र असे केल्याने त्यांचे पॅटर्न बिघडते. अशावेळेस कॅन्सरच्या पेशी वेगाने वाढू लागतात. जेव्हा शरीरात कॅन्सर पसरत असतो, तेव्हा पेशींचा कंट्रोलिंग इफेक्ट संपुष्टात येतो. यानंतर काही काळातच या पेशींची अनियंत्रित दुप्पट वाढ होऊ लागते. ही अनियंत्रित वाढच कालांतराने ट्यूमर बनतो.

ग्रेडनुसार कॅन्सरच्या पेशींचा ग्रोथ रेट

कॅन्सरचे ग्रेड आणि स्टेज वेगवेगळ्या असतात. कॅन्सरच्या स्टेजवरून समजते की हा आजार आपल्या शरीरात किती पसरला आहे. तर ग्रेडवरून जाणून घेता येते की ट्यूमरची शरीरात पसरण्याची क्षमता किती आहे.

ग्रेड 1 मध्ये कॅन्सरच्या पेशी सामान्य पेशींसारख्याच दिसतात आणि त्यांची वाढ मंद असते.

ग्रेड 2 मध्ये कॅन्सरच्या पेशी सामान्य पेशींसारख्या दिसत नाहीत आणि ग्रेड 1 च्या तुलनेत त्यांची वाढ जलद होते.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
पान सेंटरने पालटलं नशीब, महिन्याला अडीच लाख उलाढाल, सांगितला यशाचा फॉर्म्युला
सर्व पहा

ग्रेड 3 मध्ये कॅन्सरच्या पेशी खूपच असामान्य दिसतात आणि त्यांची वाढही खूपच वेगाने होत असते. या परिस्थितीत कॅन्सर शरीरात मोठ्या प्रमाणावर पसरलेला असतो.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
कॅन्सरचं आता काही खरं नाही! भारताने तयार केला बॅक्टेरिया, शरीरात कर्करोगाची वाट लावणार
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल