गरम पाण्याने अंघोळ केल्याने हाडे कमकुवत होतात का?
- हा पूर्णपणे गैरसमज आहे.
- गरम पाण्यामुळे हाडांमधील कॅल्शियम वितळत नाही.
- हाडांची मजबुती ही व्हिटॅमिन D, कॅल्शियम, प्रोटीनचे सेवन आणि शारीरिक हालचालींवर अवलंबून असते.
- थंड किंवा गरम पाण्याने अंघोळ केल्याचा हाडांच्या ताकदीवर थेट परिणाम होत नाही.
हिवाळ्यात रोज अंघोळ करणे आवश्यक आहे का?
advertisement
- हिवाळा असला तरी रोज अंघोळ करणे ही चांगली सवय आहे.
- यामुळे स्वच्छता (हायजीन) योग्य राहते.
- फक्त थंडीमुळे रोज अंघोळ टाळणे यामागे कोणताही वैज्ञानिक आधार नाही.
- मात्र ज्यांना चक्कर येणे, तोल जाण्याची समस्या किंवा पडण्याचा धोका अधिक असतो. अशा लोकांना डॉक्टर 2-3 दिवसांतून एकदा अंघोळ करण्याचा सल्ला देतात.
खूप गरम पाणी वापरणे नुकसानदायक ठरू शकते का?
- हाडांसाठी गरम पाणी अपायकारक नसले तरी खूप गरम पाणी त्वचेसाठी त्रासदायक ठरू शकते.
- जास्त गरम पाणी त्वचेतील नैसर्गिक तेल नष्ट करते.
- त्यामुळे त्वचा कोरडी पडणे, खाज सुटणे, रॅशेस येणे अशा समस्या उद्भवू शकतात.
- खूप वेळ गरम पाण्याने अंघोळ केल्यास काही लोकांमध्ये रक्तदाब कमी होण्याचाही धोका असतो.
हिवाळ्यात अंघोळ करण्याची योग्य पद्धत कोणती?
- फार गरम पाणी वापरणे टाळावे.
- पाणी कोमट असावे, जेणेकरून थंडीही लागू नये आणि त्वचेला त्रासही होऊ नये.
- अंघोळीनंतर त्वचा नीट पुसून घ्यावी.
- त्वचा कोरडी पडू नये म्हणून मॉइश्चरायझर किंवा तेल लावावे.
- योग्य तापमानाच्या पाण्याने अंघोळ केल्यास हिवाळ्यातही स्वच्छता आणि आरोग्य दोन्ही टिकवता येते.
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
