पहिल्यांदा शारीरिक संबंध ठेवल्यानंतर रक्तस्त्राव होतोच का?
प्रत्येकाच्या शरीराची रचना वेगळी असते. काही महिलांना रक्तस्त्राव होतो, तर काहींना होत नाही. दोन्ही स्थिती सामान्य मानल्या जातात. योग्य माहिती असल्यासच आपण आपले नातेसंबंध चांगले ठेवू शकतो आणि आपले शरीर सुरक्षित ठेवू शकतो.
कंडोम वापरल्यानंतरही होऊ शकतो STI?
डॉक्टरांच्या मते, शारीरिक संबंधांदरम्यान कंडोमचा वापर केल्याने STI चा धोका कमी होतो, परंतु तो १००% सुरक्षित नाही. त्वचेपासून त्वचेच्या संपर्कातून देखील संसर्ग होऊ शकतो.
advertisement
टूथपेस्ट किंवा शाम्पू लुब्रिकेंट म्हणून वापरता येतो का?
अजिबात नाही… असे केल्याने चिडचिड, संसर्ग आणि ऍलर्जी होऊ शकते. स्नेहनसाठी नेहमी वैद्यकीयदृष्ट्या सुरक्षित लुब्रिकेंटच वापरा.
विथड्रॉवल पद्धत किती सुरक्षित आहे?
विथड्रॉवल पद्धत म्हणजेच शारीरिक संबंधादरम्यान इजेकुलेशन होण्यापूर्वी लिंग बाहेर काढणे पूर्णपणे सुरक्षित नाही. यामुळे गर्भधारणेचा धोका निर्माण होतो कारण प्री-इजेकुलेटमध्ये स्पर्म देखील असू शकते.
शारीरिक संबंधांमुळे महिलांचे गुप्तांग सैल होतात का?
हा एक गैरसमज आहे. स्त्रीचा गुप्तांग हा एक लवचिक अवयव आहे, जो शारीरिक संबंधानंतर त्याच्या सामान्य स्थितीत परत येतो. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)