मूत्रपिंडं ही आपल्या शरीराची फिल्टर आहेत, रक्तातील अशुद्धता आणि अतिरिक्त पाणी याद्वारे काढून टाकलं जातं. मूत्रपिंड योग्यरित्या कार्य करू शकत नाहीत तेव्हा त्याचे परिणाम बहुतेकदा प्रथम हात आणि पायांवर जाणवतात. बऱ्याचदा लोक या सुरुवातीच्या लक्षणांना किरकोळ समजून दुर्लक्ष करतात. मूत्रपिंड केवळ विषारी पदार्थ काढून टाकण्यापुरते मर्यादित नाही तर शरीरातील पाणी, मीठ आणि पोटॅशियम आणि कॅल्शियम सारख्या खनिजांंचं संतुलन देखील राखतात.
advertisement
Winter Care : हिवाळ्याच्या संसर्गापासून करा रक्षण, वापरा आजीच्या बटव्यातलं औषध
रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी आणि रक्त निर्मितीला चालना देण्यासाठी आवश्यक हार्मोन्स तयार करण्याचं काम मूत्रपिंड करत असतात. म्हणून, या संप्रेरकांमधील कोणत्याही गडबडीचा परिणाम संपूर्ण शरीरावर होतो.
हात, पाय आणि घोट्यांमधे सूज येणं हे मूत्रपिंड निकामी होण्याचं सर्वात सामान्य लक्षण मानलं जाते.
सुजलेल्या भागावर बोट दाबल्यावर दाब निर्माण झाला तर ते द्रवपदार्थ साठल्याचं लक्षण आहे. हे मूत्रपिंड निकामी होण्याचं लक्षण असू शकतं.
मूत्रपिंडांना झालेल्या हानीमुळे स्नायूंमधे वेदना होणं, अचानक आणि तीव्र पेटके येऊ शकतात. मूत्रपिंडातील इलेक्ट्रोलाइट्सचं संतुलन बिघडल्यामुळे असं होतं. पायांच्या स्नायूंमधे वेदना आणि कडकपणा हे या समस्येचं सुरुवातीचं लक्षण असू शकतं.
हातांच्या किंवा पायांच्या त्वचेला जास्त खाज येत असेल, त्वचा कोरडी पडत असेल किंवा पुरळ येत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. मूत्रपिंड रक्तातील विषारी पदार्थ काढून टाकू शकत नाहीत, तेव्हा हे अशुद्ध घटक त्वचेखाली जमा होऊ लागतात, ज्यामुळे खाज सुटणं आणि जळजळ होऊ शकते.
Fatty Liver : फॅटी लिव्हरला silent disease का म्हणतात? शरीरावर काय परिणाम होतात?
हात आणि पाय सुन्न होणं किंवा मुंग्या येणं हे देखील मूत्रपिंड निकामी होण्याचं लक्षण असू शकतं. मूत्रपिंडांच्या हानीमुळे नसांवर परिणाम होतो. या स्थितीला वैद्यकीय भाषेत पेरिफेरल न्यूरोपॅथी म्हणून ओळखली जाते.
पायांमधे सतत वेदना, अशक्तपणा किंवा थकवा येणं हे देखील मूत्रपिंडांच्या समस्यांशी संबंधित आहे. शरीरात विषारी पदार्थांचा साठा झाला तर हाडं आणि स्नायूंवर परिणाम होतो.
यापैकी कोणतीही लक्षणं दिसली तर ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि मूत्रपिंडांची तपासणी करा, लवकर निदान झालं तर मूत्रपिंडाचा आजार वेळेत नियंत्रित केला जाऊ शकतो.
