10-स्टेप कोरियन स्किनकेअर रुटीन..
ऑइल-बेस्ड क्लींजर : चेहऱ्यावरील मेकअप आणि घाण काढण्यासाठी ऑइल-बेस्ड क्लींजरचा वापर करा. क्लींजरचे काही थेंब तळहातावर घेऊन, चेहऱ्यावर गोलाकार मसाज करा.
फोम किंवा वॉटर-बेस्ड क्लींजर : यानंतर फोम किंवा वॉटर-बेस्ड क्लींजर वापरून चेहरा पुन्हा एकदा स्वच्छ धुवा. ही प्रक्रिया तुमच्या त्वचेवरील घाम आणि धुळीसारख्या सर्व अशुद्धी काढून टाकेल.
advertisement
एक्सफोलिएटर : हा स्टेप तुमच्या त्वचेतील मृत पेशी काढून टाकतो आणि मुरुम होण्यापासून रोखतो. तुम्ही स्क्रब्स, पील्स किंवा पॅड्सपैकी तुमच्या त्वचेसाठी योग्य वाटेल ते एक्सफोलिएटर निवडू शकता.
टोनर : तुमच्या त्वचेचा pH स्तर संतुलित ठेवण्यासाठी टोनरचा वापर करा. टोनर निवडताना त्वचेच्या प्रकारानुसार काळजी घ्या, कारण काही टोनरमुळे त्वचा कोरडी होऊ शकते.
एसेन्स : के-ब्युटी प्रेमींना एसेन्स वापरणे खूप आवडते. हे तुमच्या त्वचेला अतिरिक्त पोषण देते.
सीरम : ही स्टेप तुमच्या त्वचेला विशेष काळजी देते. डाग किंवा मुरुमांसारख्या विशिष्ट समस्यांसाठी तुम्ही सीरम वापरू शकता.
शीट मास्क : ही कदाचित सर्वात आरामदायी स्टेप आहे. शीट मास्क लावून 10-15 मिनिटे आराम करा. शीट मास्क कोरड्या त्वचेसाठी एक चांगला उपाय आहे.
आय क्रीम : कामामुळे किंवा इतर कारणांमुळे डोळ्यांखालील सूज ही एक सामान्य समस्या आहे. ही समस्या दूर करण्यासाठी आय क्रीम, रोलर किंवा जेल वापरा.
मॉइश्चरायझर : ही स्टेप तुमच्या त्वचेला हायड्रेट करते. तुम्ही वॉटर किंवा क्रीम-बेस्ड मॉइश्चरायझर वापरू शकता.
सनस्क्रीन : शेवटची आणि सर्वात महत्त्वाची स्टेप म्हणजे सनस्क्रीन लावणे. हे तुमच्या त्वचेला हानिकारक अतिनील किरणांपासून वाचवते.