लबूबू म्हणजे काय..?
लबूबू हे 'द मास्टर्स' या व्हिएतनामी डिजिटल आर्ट बँडमधील लबूबू एक लोकप्रिय कॅरेक्टर आहे. बुटके शरीर, मोठे डोळे आणि मजेशीर चेहरा असलेले हे गोंडस पात्र इंटरनेटवर खूपच गाजले. सुरुवातीला टॉयज आणि ॲनिमेटेड व्हिडिओमधून झळकलेले लबूबू आता सोशल मीडियावर स्टिकर्स, रिल्सच्या रूपात जगभरातील नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. विशेषतः टीन एजर्स आणि युवा वर्गात लबूबूची क्रेझ प्रचंड आहे.
advertisement
Labubu Doll: लबूबू डॉलचा ट्रेंड आहे तरी काय? मुंबईत तर फक्त 350 रुपयांमध्ये करा खरेदी, Video
विक्रेते राख्या कोठून आणतात..!
बाजारपेठेत या राख्या मोठ्या संख्येने विक्रीसाठी उपलब्ध असून, लबूबू राखीची किंमत 200 ते 350 रुपयांदरम्यान आहे. त्याशिवाय पारंपरिक झरझरीत, कुंदन, मोरपंख, पर्ल डिझाईन राख्या, तसेच सुपरहिरो, युनिकॉर्न, मिनियन, टॉम अँड जेरी इत्यादी कार्टून थीम्स असलेल्या राख्या 50 ते 500 रुपयांपर्यंत मिळत आहेत. ग्राहकांची पसंती लहान मुलांसाठी कार्टून राख्यांकडे तर तरुणाई लाबुबु आणि ट्रेंडी राख्यांकडे झुकताना दिसत आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये राख्यांचा माल सुरत, दिल्ली, कलकत्ता, मुंबई येथून मोठ्या प्रमाणात राख्यांचा माल येतो. 5 रुपयांपासून ते 1 हजार रुपयांपर्यंत राख्या उपलब्ध असल्याचे राखी विक्रेत्या चित्रा वाणी यांनी सांगितले आहे.





