ती म्हणजे गुलाबजाम, हो आपण वाचलेल्या चपात्यांपासून गुलाबजाम बनवणार आहोत, तेही असे की खाल्ल्यानंतर कोणालाही वाटणार नाही की ते चपातीपासून बनवले आहेत.
ना मावा, ना महाग साहित्य फक्त घरातलीच साधी सामग्री आणि थोडं प्रेम! चला, तर मग जाणून घेऊया ही स्वादिष्ट, रसाळ आणि कमी खर्चात तयार होणारी खास रेसिपी.
साहित्य :
advertisement
2 रात्रीच्या उरलेल्या कोरड्या चपाती
1 टेबलस्पून गव्हाचं पीठ
1 कप कोमट दूध
2 कप साखर
2 कप पाणी
2 कप मिल्क पावडर
½ टीस्पून बेकिंग पावडर
1 टेबलस्पून तूप
सुका मेवा (बदाम, मनुका इ.)
केवडा एसेंस किंवा वेलची पूड (चवीनुसार)
तळण्यासाठी तूप किंवा तेल
कृती :
1. चपात्यांचं पीठ तयार करणं :
सुरुवातीला चपाती थोड्या गरम तव्यावर परतून कुरकुरीत करा. मग त्या लहान तुकड्यांमध्ये कापून मिक्सरमध्ये थोड्या जाडसर वाटा. आता त्यात गव्हाचं पीठ घालून पुन्हा थोडं वाटा आणि हे मिश्रण चाळून एका भांड्यात ठेवा.
2. पाक बनवणं :
एका पातेल्यात साखर आणि पाणी एकत्र करून उकळा. साखर विरघळल्यावर 3-4 मिनिटं मंद आचेवर शिजवा.
पाक थोडं चिकट झालं की गॅस बंद करा. त्यात वेलची पूड किंवा थोडं केसर टाका आणि हलकं कोमट राहू द्या.
3. गोळा (डो) तयार करणं :
चपातीचं मिश्रण दूधात भिजवा आणि 10 मिनिटं झाकून ठेवा.
यानंतर त्यात मिल्क पावडर, बेकिंग पावडर आणि तूप घालून मळा.
जर गरज वाटली तर थोडं दूध अजून घाला. मिश्रण खूप सैल किंवा खूप घट्ट नसावं.
कापलेला सुका मेवा थोड्या मिश्रणात मिसळा. हवं असल्यास हलका फूड कलरही टाकू शकता.
मिश्रणाचे छोटे गोळे बनवा.
4. तळणं :
कढईत तूप किंवा तेल गरम करा. मध्यम आचेवर हे गुलाबजाम सावकाश तळा. ते सोनेरी तपकिरी झाले की बाहेर काढा.
5. पाकात भिजवणं :
तळलेले गुलाबजाम कोमट पाकात टाका आणि किमान 1 तास तसेच राहू द्या. ते चांगले रसाळ आणि मऊ होतील.
वरून सुका मेवा किंवा चांदीचा वर्क लावा. थंड करून, गरमागरम किंवा आइसक्रीमसोबत कसेही सर्व्ह करा.