TRENDING:

Healthy Idli Recipe : झटपट बनवा बाजरी-रवा इडली, तेही भरपूर भाज्यांसह! पाहा अगदी हेल्दी आणि सोपी रेसिपी

Last Updated:

Rava Bajra And Vegetable Idli Recipe : तुम्ही दक्षिण भारतीय जेवणाचे चाहते असाल आणि तेल आणि तूप न वापरता दक्षिण भारतीय नाश्ता कसा बनवायचा याबद्दल विचार करत असाल, तर आज आम्ही तुमच्यासाठी एक खास नाश्त्याचा घेऊन आलो आहोत

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : आतापर्यंत तुम्ही बाजरीच्या भाकरीसह काही पदार्थांबद्दल ऐकले असेल. हिवाळ्यात बाजरी खायला हवी. कारण ती खूप आरोग्यदायी असते. तुम्ही दक्षिण भारतीय जेवणाचे चाहते असाल आणि तेल आणि तूप न वापरता दक्षिण भारतीय नाश्ता कसा बनवायचा याबद्दल विचार करत असाल, तर आज आम्ही तुमच्यासाठी एक खास नाश्त्याचा घेऊन आलो आहोत, जो केवळ दक्षिण भारतीयच नाही तर आरोग्यदायी देखील आहे.
News18
News18
advertisement

आज आम्ही तुम्हाला रवा बाजरीच्या इडलीबद्दल सांगत आहोत, जी खूप हेल्दी आहे. यामध्ये भरपूर भाज्या वापरल्या जाणार आहेत. तसेच ही इडली तेल आणि तूप न वापरता बनवली जाते. इंस्टाग्रामवर meltin_mouth या अकाऊंटवर ही संपूर्ण रेसिपी दिली गेली आहे.

रवा-बाजरीची इडली बनवण्यासाठी लागणारे साहित्य

बाजरीचे पीठ - 1/2 कप

रवा - 1 कप

advertisement

दही - 1 कप

मीठ - चवीनुसार

पाणी - आवश्यकतेनुसार

बेकिंग सोडा - 1/2 चमचा

कढीपत्ता - 6-8

हिरव्या मिरच्या - बारीक चिरून

गाजर, मटारसारख्या तुमच्या आवडत्या भाज्या

मोहरी - 1/2 चमचा

तेल - 1 टेबलस्पून

रवा-बाजरीची इडली बनवण्याची कृती

रवा बाजरीची इडली बनवण्यासाठी तुम्हाला प्रथम टेम्परिंग तयार करावे लागेल. एका पॅनमध्ये तेल गरम करा. त्यात मोहरी, कढीपत्ता आणि हिरव्या मिरच्या घाला आणि परतून घ्या. आणि तुम्हाला हव्या असलेल्या भाज्या घाला. मंद आचेवर 5-6 मिनिटे परतून घ्या. थोडा वेळ थंड होऊ द्या. थंड झाल्यावर ते एका मोठ्या भांड्यात काढा, त्यामध्ये रवा, बाजरीचे पीठ, दही आणि पाणी घालून इडलीसाठो हवे असलेले बॅटर तयार करा. मीठ घाला, चांगले मिसळा, झाकून ठेवा आणि 15-20 मिनिटे राहू द्या.

advertisement

यानंतर, इडलीच्या साच्यांना थोडे तेल लावा आणि तयार बॅटर त्यामध्ये भरा. ते स्टीमरमध्ये ठेवा आणि मंद आचेवर 10-15 मिनिटे शिजवा. इडली शिजल्यानंतर चमच्याने बाहेर काढा आणि नाश्त्यासाठी कोथिंबिरीची चटणी किंवा सांबारसह त्याचा आनंद घ्या. हे केवळ तुमच्या कुटुंबाचे आरोग्य राखेलच असे नाही तर तुमच्या नाश्त्याची चव देखील वाढवेल.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
मक्याचे दर स्थिर, कांद्यामध्ये पुन्हा घसरण, सोयाबीनला आज काय मिळाला भाव? Video
सर्व पहा

Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि आरोग्याशी संबंधित सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून, डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच काहीही वापरा. त्याच्या वापरामुळे होणाऱ्या कोणत्याही नुकसानासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.

advertisement

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Healthy Idli Recipe : झटपट बनवा बाजरी-रवा इडली, तेही भरपूर भाज्यांसह! पाहा अगदी हेल्दी आणि सोपी रेसिपी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल