अनेक लोक यावर विचार करतील की, जेवताना एवढा विचार करण्याची काय गरज आहे? जोपर्यंत आपले पोट भरलेले आहे, तोपर्यंत माइंडफुल इटिंगची काय गरज आहे? अनेकजण तुम्हाला माइंडफुल इटिंग कसे करावे हे सांगतील. पण जोपर्यंत तुम्हाला त्याचे फायदे पटत नाहीत, तोपर्यंत तुम्ही ते मनापासून फॉलो करणार नाही. म्हणूनच माइंडफुल इटिंग सुरू करण्यापूर्वी त्याचे फायदे समजून घेणे महत्त्वाचे आहे.
advertisement
माइंडफुल इटिंगचे फायदे..
वजन कमी करण्यास मदत करते : माइंडफुल इटिंगचा संबंध वजन कमी करण्याशी आहे. जेव्हा तुम्ही तुमच्या भूक लागण्याचे आणि पोट भरल्याचे संकेत ओळखायला शिकता, तेव्हा तुम्ही जेवणाचे प्रमाण अधिक चांगल्या प्रकारे नियंत्रित करू शकता. माइंडफुल इटिंगमुळे तुम्ही खात असलेल्या अन्नाच्या चवीवर आणि तुम्हाला पोट भरल्याची जाणीव होते, त्यामुळे तुम्ही जास्त खात नाही. याचा परिणाम म्हणून नकळतपणे तुमच्या कॅलरीचे सेवन कमी होते.
जास्त खाण्यावर नियंत्रण ठेवते : आजच्या पिढीला जास्त खाण्याच्या सवयीने खूप त्रास होतो. आपण अनेकदा खूप जास्त अन्न घाईघाईने आणि विचार न करता खातो. माइंडफुल इटिंगचा वापर केल्यास कमी खाता आणि वारंवार खाणेही टाळले जाते. जेव्हा आपण खाण्याकडे लक्ष देण्यास सुरुवात करतो, तेव्हा आपल्याला आपल्या खाण्याच्या सवयींची जाणीव होते, ज्यामुळे आपण जास्त खाणे टाळतो.
मानसिक आरोग्य सुधारते : संशोधनातून हे सिद्ध झाले आहे की, माइंडफुल इटिंग मानसिक आरोग्य सुधारू शकते. तसेच जेवणाचा आनंद वाढवते आणि शरीराला समाधान देते. माइंडफुलनेससारख्या वर्तणुकीच्या हस्तक्षेपांना पोषणविषयक ज्ञानासोबत जोडल्यास आरोग्यासाठी चांगले पर्याय निवडता येतात. यामुळे जुनाट आजारांचा धोका कमी होतो, जेवणाचा अनुभव अधिक आनंददायी होतो आणि शरीराबद्दल सकारात्मक भावना निर्माण होते.
तुम्हाला माइंडफुल इटिंगचे फायदे पटले असतील, तर लगेचच ही सवय सुरू करा. सुरुवातीला, तुम्ही फक्त जेवण करताना पूर्ण लक्ष खाण्यावर केंद्रित करू शकता आणि अनियमित वेळी खाणे टाळू शकता.