मुंबईत कोरोनामुळे तिघांचा मृत्यू झाला आहे. एक 70 वर्षीय व्यक्ती जिला हृदयाचा आजार होता, तिचा खासगी मृत्यू झाला. मृत्यूनंतर तिला कोरोना असल्याचं समजलं. 9 दिवसांपूर्वी मृत्यू झालेल्या या रुग्णाबाबत मुंबई महापालिकेला दोन दिवसांपूर्वी माहिती मिळाली आहे. याशिवाय रविवारी एकाच दिवशी दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यातील एक 14 वर्षांची मुलगी जिला किडनीचा आजार होता. तर दुसरी 59 वर्षांची महिला जिला कॅन्सर होता. तिच्यावर केईएम रुग्णालयात उपचार सुरू होते.
advertisement
मुंबईत मे महिन्यात सर्वाधिक रुग्ण
राज्यात कोरोनाबाधित रुग्णांत वाढ होत आहे. जानेवारी 2025 पासून राज्यात एकूण 6819 कोविड चाचण्या करण्यात आल्या. त्यापैकी 210 रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. शुक्रवारी 23 मे रोजी नवीन 45 रुग्णांची नोंद झाली. यामध्ये एकट्या मुंबईत सर्वाधिक 35 रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या आता 185 वर पोहोचली आहे. माहितीनुसार मे महिन्यात सर्वाधिक 177 प्रकरणांची नोंद झाली आहे.
यामुळे मुंबई महापालिकेचा आरोग्य विभागही सतर्क झाला आहे. विविध रुग्णालयांत राखीव खाटांची व्यवस्था केली असून गरज पडल्यास आरोग्य सेवेत वाढ करण्यात येणार असल्याचं बीएमसीने सांगितलं आहे. मात्र हे सर्व रुग्ण फ्ल्यू आणि सहव्याधी असलेले आहेत. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता, काळजी घेण्याचं आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आलं.
सर्दी, खोकला आणि तापसदृश लक्षणं दिसून आलेल्या रुग्णांची कोरोना तपासणी करण्यात येत आहे. यामध्ये कोविडबाधित रुग्ण आढळल्यास त्याला पालिकेच्या शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. तसंच काही उपनगरातील रुग्णालयात रुग्णांसाठी विशेष बेड आणि विशेष खोल्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. सध्या असलेल्या सक्रिय रुग्णांमध्ये सौम्य लक्षणं असल्याने ते घरीच उपचार घेत आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली.
महिला-पुरुष दोघांना होतो हा आजार, पण पुरुषांचे थेट जीवच घेतो, संशोधनात धक्कादायक माहिती समोर
ठाण्यातही वाढती प्रकरणं
मुंबईशेजारी ठाण्यातही कोरोनाची प्रकरणं वाढत आहेत. गेल्या 3 दिवसांत कोरोनाचे 10 रुग्ण आढळून आले आहेत. यांच्यात सौम्य लक्षणं असून त्यांच्यावर घरीच उपचार सुरू आहेत. अशी माहिती ठाणे महापालिका आयुक्तांनी दिली आहे.