महिला-पुरुष दोघांना होतो हा आजार, पण पुरुषांचे थेट जीवच घेतो, संशोधनात धक्कादायक माहिती समोर

Last Updated:

Heart Disease Deadly for Men Than Women : सुमारे दोन लाख अमेरिकन लोकांवर संशोधन करण्यात आलं. अभ्यासानुसार एक असा आजार ज्यामुळे होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण पुरुषांमध्ये महिलांपेक्षा दुप्पट आहे.

News18
News18
नवी दिल्ली : आजार बऱ्याच प्रकारचे आहेत. काही विशिष्ट आजार जे फक्त महिलांना किंवा फक्त पुरुषांना होतात. तर काही आजार महिला-पुरुष दोघांनाही होतात. प्रत्येक आजाराचा परिणाम त्या त्या व्यक्तीवर वेगवेगळा असू शकतो. म्हणजे त्या व्यक्तीच्या आजाराशी लढण्याची क्षमता वेगवेगळी असू शकते. पण एक असा आजार जो महिला-पुरुष दोघांनाही होतो पण पुरुषांचे सर्वाधिक बळी घेतो. एका संशोधनात ही धक्कादायक बाब समोर आली आहे.
हा अभ्यास जर्नल ऑफ अमेरिकन हार्ट असोसिएशनमध्ये प्रकाशित झाला आहे, ज्यामध्ये 2016 ते 2020 पर्यंत सुमारे दोन लाख अमेरिकन लोकांवर संशोधन करण्यात आलं. अभ्यासानुसार एक असा आजार ज्यामुळे होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण पुरुषांमध्ये महिलांपेक्षा दुप्पट आहे.
संशोधनात काय दिसलं?
संशोधकांनी असे निरीक्षण नोंदवले की या आजारामुळे होणाऱ्या मृत्युदराचे प्रमाण 6.5 टक्के होते. तथापि, गेल्या पाच वर्षांत यामध्ये कोणतीही सुधारणा झाली नाही. या आजाराने ग्रस्त महिलांमध्ये मृत्युदर 5.5 टक्के होता, तर पुरुषांमध्ये मृत्युदर 11.2 टक्के होता.
advertisement
संशोधनातून असे दिसून आले की हा आजार 61 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांसाठी खूप घातक आहे. त्याच वेळी, 46 ते 60 वर्षे वयोगटातील लोकांना 31 ते 45 वर्षे वयोगटातील तरुणांच्या तुलनेत हा आजार होण्याची शक्यता 2.6 ते 3.25 पट जास्त असल्याचे आढळून आलं.
advertisement
जास्त मृत्यू कशामुळे होतात?
संशोधनादरम्यान, रुग्णांमध्ये अनेक गंभीर समस्या दिसून आल्या. अशा प्रकरणांमध्ये, 35.9 टक्के लोकांना कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअरमुळे, 20.7 टक्के लोकांना अ‍ॅट्रियल फायब्रिलेशन (अनियमित हृदयाचे ठोके) मुळे, 6.6 टक्के लोकांना कार्डिओजेनिक शॉकमुळे, 5.3 टक्के लोकांना स्ट्रोकमुळे आणि 3.4 टक्के लोकांना हृदयविकाराच्या झटक्याने आपला जीव गमवावा लागला.
कोणता आहे हा आजार?
हा आजार आहे ब्रोकन हार्ट सिंड्रोम. ज्याला वैद्यकीय भाषेत टाकोत्सुबो कार्डिओमायोपॅथी असेही म्हणतात. खरं तर, जेव्हा एखाद्या प्रिय व्यक्तीच्या मृत्यूची बातमी मिळते तेव्हा त्याच्या मनात तीव्र भावना निर्माण होतात. हृदयाची ही स्थिती हृदयविकाराच्या झटक्यासारखीच मानली जाते.
advertisement
यामुळे छातीत दुखणं, श्वास घेण्यास त्रास होणं, हृदयाचे ठोके वाढणं आणि अनेक प्रकरणांमध्ये अनियमित हृदयाचे ठोके अशी लक्षणं देखील दिसून येतात. जर वेळेवर उपचार केले नाहीत तर अनेक समस्या उद्भवू शकतात. या कारणांमुळे मृत्यू देखील होऊ शकतो.
advertisement
अभ्यासाचे लेखक डॉ. मोहम्मद रजा मोवाहेद हे इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजिस्ट आणि अ‍ॅरिझोना विद्यापीठाच्या सर्वर हार्ट सेंटरमध्ये प्राध्यापक आहेत. ते म्हणाले की, टाकोत्सुबो कार्डिओमायोपॅथी हा एक अतिशय गंभीर आजार आहे, ज्यामध्ये मृत्यूचा धोका खूप जास्त असतो. ते म्हणाले की या आजारामुळे मृत्यूचे प्रमाण सतत वाढत आहे, ही एक गंभीर परिस्थिती आहे. त्याच्या उपचारांसाठी संशोधनाची मागणी त्यांनी केली आहे.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
महिला-पुरुष दोघांना होतो हा आजार, पण पुरुषांचे थेट जीवच घेतो, संशोधनात धक्कादायक माहिती समोर
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement