Mumbai Coronavirus : मुंबई पुन्हा कोरोनाच्या विळख्यात! राज्यात नाहीत इतके रुग्ण एकट्या मुंबईत, आकडा वाचूनच आकडी येईल

Last Updated:

Coronavirus In Mumbai : मुंबईतील कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता बीएमसीचा आरोग्य विभागही सतर्क झाला आहे. विविध रुग्णालयांत राखीव खाटांची व्यवस्था केली असून गरज पडल्यास आरोग्य सेवेत वाढ करण्यात येणार असल्याचं बीएमसीने सांगितलं आहे.

News18
News18
मुंबई : कोरोना कायमचा गेला, असा सगळ्यांनी सुटकेचा निश्वास टाकलेला असताना आता मात्र कोरोनाने पुन्हा डोकं वर काढलं आहे. त्यामुळे सगळ्यांना धडकी भरली आहे. राज्यात कोरोनाचे रुग्ण पुन्हा आढळू लागले आहेत. त्यातील सर्वाधिक रुग्ण मुंबईत आहेत. मुंबईला पुन्हा कोरोनाचा विळखा बसतो आहे.
राज्यात कोरोनाबाधित रुग्णांत वाढ होत आहे. जानेवारी 2025 पासून राज्यात एकूण 6819 कोविड चाचण्या करण्यात आल्या. त्यापैकी 210 रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत.  शुक्रवारी 23 मे रोजी नवीन 45 रुग्णांची नोंद झाली. यामध्ये एकट्या मुंबईत सर्वाधिक 35 रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या आता 185 वर पोहोचली आहे.
advertisement
यामुळे मुंबई महापालिकेचा आरोग्य विभागही सतर्क झाला आहे. विविध रुग्णालयांत राखीव खाटांची व्यवस्था केली असून गरज पडल्यास आरोग्य सेवेत वाढ करण्यात येणार असल्याचं बीएमसीने सांगितलं आहे. मात्र हे सर्व रुग्ण फ्ल्यू आणि सहव्याधी असलेले आहेत. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता, काळजी घेण्याचं आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आलं.
advertisement
सर्दी, खोकला आणि तापसदृश लक्षणं दिसून आलेल्या रुग्णांची कोरोना तपासणी करण्यात येत आहे. यामध्ये कोविडबाधित रुग्ण आढळल्यास त्याला पालिकेच्या शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. तसंच काही उपनगरातील रुग्णालयात रुग्णांसाठी विशेष बेड आणि विशेष खोल्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. सध्या असलेल्या सक्रिय रुग्णांमध्ये सौम्य लक्षणं असल्याने ते घरीच उपचार घेत आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली.
advertisement
महाराष्ट्रात कोरोनाव्हायरसची लागण झालेला पहिला रुग्ण पुण्यामध्ये 9 मार्च 2020 रोजी आढळून आला होता. महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी 16 मार्च 2020 रोजी मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात उपचारादरम्यान झाला. यानंतर मुंबई, पुण्यातील कोरोनाची प्रकरणं वाढतच होती. कित्येक महिन्यांनी कोरोनातून सुटका झाली. पण आता मुंबईत कोरोनाने पुन्हा हातपाय पसरायला सुरुवात केल्याने चिंता वाढली आहे. कोरोनाची प्रकरणं झपाट्याने वाढत आहेत. त्यामुळे पुन्हा लॉकडाऊन लागणार का? अशी भीतीही अनेकांना वाटू लागली आहे.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Mumbai Coronavirus : मुंबई पुन्हा कोरोनाच्या विळख्यात! राज्यात नाहीत इतके रुग्ण एकट्या मुंबईत, आकडा वाचूनच आकडी येईल
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement