कुठे मिळतील वस्तू?
दादरच्या नक्षत्र मॉल परिसरात असलेल्या अर्थस सोल या दुकानात प्राचीन काळात वापरल्या जाणाऱ्या गृह उपयोगी वस्तू मिळतात. या दुकानाचे मालक योगेश चव्हाण सुरुवातीच्या काळात दादर स्टेशन जवळ देवाच्या पूजेचे सामान आणि मूर्ती विकत होते. ग्राहकांची मागणी लक्षात घेता त्यांनी या ठिकाणी दगडी दिवे, दगडी जातं, दगडी पाटा वरवंटा, खलबत्ता विकण्यास सुरू केले.
advertisement
ऐकावं ते नवलंच! आता आली मेहुणीसाठी राखी, पण भाभी राखी बांधायची कुठं?
काय आहे किंमत?
देवांच्या पूजेसाठी लागणारे विशेष दगडी दिवे या ठिकाणी 250 रुपयांना उपलब्ध आहेत. दगडी खलबत्ता येथे 500 रुपयांना मिळेल. बाकी वस्तूंची किंमत 250 रुपयांच्या पुढे आहे. दगडी वस्तूच नव्हे तर या ठिकाणी कॉपरच्या कळशी देखील मिळतात. या कळशांमध्ये कल्हई केली गेली आहे. ज्यामुळे या कळशीमध्ये अगदी जेवण देखील शिजवता येते आणि जेवण त्यात काळपटनार ही नाही.
गौरीच्या सजावटीमध्ये मुंबईत ‘या’ सिनेमाचा ट्रेन्ड, 300 रुपयांमध्ये ‘इथं’ घ्या सुंदर मुखवटे
काळाप्रमाणे लुप्त झालेल्या या गृह उद्योग वस्तूंना आजही मागणी आहे. अशा जुन्या वस्तूंचे महत्त्व जपणाऱ्या माणसांसाठी दादरच्या या परिसरात दगडी वस्तू उपलब्ध आहेत, अशी माहिती येथील मालक योगेश चव्हाण यांनी दिली आहे.