मुंबई: लेदर हे कधीच आऊट ऑफ फॅशन जात नाही. कोणत्याही वेळी तुम्ही लेदर हमखास वापरू शकता. कारण लेदरचा लुक आणि स्टाईल प्रोफेशनल मानली जाते. जर तुम्हाला वेगवेगळ्या लेदरच्या वस्तू विकत घ्यायच्या असतील तर मुंबईत एक बेस्ट ठिकाण आहे. धारावीमधील लेदर म्युझियम या दुकानाला तुम्ही भेट देऊ शकता. या दुकानात तुम्हाला लेदरच्या 100 पेक्षा जास्त व्हरायटी मिळून जातील.
advertisement
लेदर जॅकेटमध्ये शिप लेदर, क्रंच लेदर, स्वेट लेदर असे प्रकार आहेत. लेदर जॅकेटची किंमत ही 4 हजार रुपयांपासून सुरु होते. अगदी 7 हजार रुपयांपर्यंत अगदी स्टायलिश लेदर जॅकेट मिळतात. महिला आणि पुरुषांसह लहान मुलांच्या लेदर जॅकेटमध्येही इथे अनेक व्हरायटी आहेत. तसेच जिन्स किंवा फॉर्मल कपड्यांवर सिम्पल बेल्ट इथे उपलब्ध आहेत. काही जणांना बेल्टमध्ये फक्त लेदरचे बेल्ट विशेष आवडतात. या दुकानात वेगवेगळ्या प्रकारच्या बेल्टची किंमत 550 ते 1050 एवढी आहे.
सिद्धिविनायक दर्शन 5 दिवसांसाठी बंद, कारण काय? पुन्हा कधी सुरू होणार
काय आहेत बॅगच्या किमती?
लेदर म्यूझियममध्ये बॅग पॅक, ऑफिस बॅग, लॅपटॉप बॅग मोठ्या सुटकेस बॅग या सर्व लेदर मध्ये तुम्हाला हमखास मिळून जातील. तसेच युनीसेक्स स्लिंग बॅग म्हणजे पुरुष आणि स्त्री दोघेही वापरू शकतात. अशा प्रकारच्या वन साईड बॅग फक्त 1500 रुपयांपासून सुरू होतात. त्याच्यात देखील तुम्हाला वेगवेगळे रंग आणि साईज हमखास मिळून जातील. लांबच्या प्रवासासाठी वापरात येणारी ट्रॉली बॅग इथे तुम्हाला वेगवेगळ्या लूकमध्ये आणि स्टाईल मध्ये मिळून जाईल. ट्रॉली बॅगची किंमत 5 हजार रुपयांपासून सुरू होते. या बॅगमध्ये देखील तुम्ही जी साईज निवडणार त्यानुसार त्याची किंमत वाढत जाते.
महिलांसाठी खास बॅग
वेगवेगळ्या प्रकारच्या डफल बॅग 3 हजार ते 5 हजार रुपयापर्यंत मिळून जातील. यात देखील ट्रॉली, विदाऊट ट्रॉली असे वेगवेगळे प्रकार आहेत. साईज नुसार देखील इथे किंमत वाढत जाते. महिलांना ऑफिसला घेऊन जाण्यासाठी किंवा प्रोफेशनल कामासाठी लेदरच्या परफेक्ट स्टायलिश बॅग इथे तुम्हाला विकत मिळतील. लेदरच्या लेडीज बॅगमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या व्हरायटी दुकानात आहेत. मॅट शायनिंग लुक असलेल्या बॅगची किंमत साधारण 1500 रुपयांपासून सुरू होते.
लेदर खरेदी करताय? खऱ्या आणि खोट्याचा फरक कसा ओळखाल? Follow करा सोप्या टीप्स
लॅपटॉप बॅगला मोठी मागणी
या दुकानात सर्वात जास्त बेस्ट सेलिंग प्रॉडक्ट आणि व्हरायटी आहे तर ती म्हणजे लॅपटॉप बॅग मध्ये. लॅपटॉपच्या वेगवेगळ्या प्रकारच्या बॅगचे तुम्हाला न्यू कलेक्शन या दुकानात मिळून जाईल. 2 हजार रुपयांपासून ते 4 हजार रुपयांपर्यंत येथील लॅपटॉप बॅगची किंमत आहे. तसेच बाजारात सध्या ट्रेंडिंग असणारी स्लिक लॅपटॉप बॅग देखील इथे तुम्हाला मिळून जाईल.
लेदर बुटमध्येही व्हरायटी
लेदरच्या बुट्समध्ये कॅज्युअल बूट्स, फॉर्मल बूट्स, लेस बूट्स, विदाऊट लेस बूट्स आणि लोफर बुटच्या सुद्धा व्हरायटी इथे उपलब्ध आहेत. तसेच सर्व न्यू कलेक्शन तुम्हाला 1 हजार ते 5 हजार रुपयांपर्यंत मिळून जाईल. त्यामुळे आपणही लेदर वस्तूंचे चाहते असाल तर लेदर म्यूझियमला नक्की भेट देऊ शकता.





