मुंबई: खास शॉपिंग करायची असेल तर मुंबईत अनेक प्रसिद्ध मार्केट आहेत. दादरचं मनीष मार्केट असंच एक प्रसिद्ध मार्केट असून इथं आपल्याला कपड्याचे बरेच प्रकार पहायला मिळतील. जर तुम्हाला लहान मुलांसाठी कपडे विकत घ्यायचे असतील, तर फक्त 150 रुपयांपासून एकापेक्षा एक फॅन्सी व्हरायटी इथं मिळतील. मनीष मार्केटमधील श्रद्धा ड्रेसेस येथे अगदी होलसेल दरात अनेक व्हरायटी आणि डिझाईनचे कपडे मिळतात. याबाबत लोकल18 च्या माध्यमातून जाणून घेऊ.
advertisement
मोठ्या लोकांसाठी कपडे विकत खरेदी करायचे असतील तर आपल्याला बरेच पर्याय मिळतात. पण लहान मुलांसाठी कपडे खरेदी करण्यासाठी आपल्याला बऱ्याचदा दुकानांचा शोध घ्यावा लागतो. दादर रेल्वे स्थानकापासून एक मिनिटाच्या अंतरावर असणारे मनीष मार्केट हे त्याच्या होलसेल दुकानांसाठी प्रसिद्ध आहे. याच मार्केटमध्ये आपल्याला मुलींसाठी वेगवेगळे कुर्ती, मटेरियल, रेडिमेट ड्रेसेस तसेच मुलांसाठी शर्ट पॅन्ट अशाचप्रकारची अनेक दुकाने आहेत. अगदी होलसेल दरात याठिकाणी आकर्षक कपडे मिळतात.
शिवप्रेमींसाठी हक्काचे ठिकाण, घडेल शिवरायांची प्रचिती, मुंबईतील या ठिकाणाला नक्की भेट द्या
मनीष मार्केटमध्ये श्रद्धा ड्रेसेस हे होलसेल दुकान असून इथं लहान मुलांचे कपडे फक्त 150 रुपयांपासून मिळतात. डिझाईन आणि व्हरायटीनुसार कपड्यांच्या किमती वाढत जातात. ट्रेडिंग फ्रॉक तुम्हाला इथे 200 रुपयांपासून मिळून जातील तर वेगवेगळ्या प्रकारचे ट्रेडिशनल ड्रेस 300 रुपयांमध्ये मिळून जातील.
दरम्यान, या दुकानाचे वैशिष्ट्य म्हणजे या दुकानात विकत मिळणारा माल हा परदेशात म्हणजेच केनिया, साऊथ कोरिया यासारख्या देशांमध्ये देखील विकला जातो. या दुकानात मिळणारे सर्व ड्रेसेस तुम्हाला फॅन्सी आणि ट्रेडिंग स्टाईलचे विकत मिळतील. तसेच ड्रेस बरोबर तुम्हाला पर्स आणि वेगवेगळ्या वस्तू देखील विकत मिळतील.