आजकाल बहुतेकांच्या जीवनाचा एक भाग म्हणजे तणाव....कधीकधी तर कोणतंही स्पष्ट कारण नसताना दुःखी वाटतं किंवा थकवा जाणवतो. याचा परिणाम तुमच्या कामावर होतो. पण हे जर तुमच्यासोबत वारंवार घडत असेल, तुम्हाला नेहमीच ताण येत असेल, तर हा लेख तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकतो.
इथे सांगितलेल्या काही सोप्या पद्धतींचा वापर करुन, तणाव आणि थकवा दूर होऊन तुमचा मूड सुधारायला मदत होईल आणि तुमच्या एकूण आरोग्यावरही सकारात्मक परिणाम होईल.
advertisement
या खास पद्धती प्रसिद्ध योगगुरू आणि लेखिका हंसा योगेंद्र यांनी त्यांच्या यूट्यूब चॅनेलवर शेअर केल्या आहेत. हे संप्रेरक केवळ मूड सुधारत नाही तर झोप, पचन, स्मरणशक्ती आणि मानसिक संतुलनात देखील याची मदत होते. हे संप्रेरक नैसर्गिकरित्या वाढवण्यासाठी या टिप्सचा वापर होईल.
Ear Care : कान बंद झालेत ? डॉक्टरांनी सांगितलेले हे तीन उपाय वापरुन पाहा
सकाळी थोडा सूर्यप्रकाश घ्या - दररोज पंधरा-वीस मिनिटं सकाळच्या सूर्यप्रकाशात घालवा. यामुळे सेरोटोनिन वाढतं. म्हणूनच सूर्यनमस्कार केवळ योगिकच नाही तर वैज्ञानिकदृष्ट्या देखील फायदेशीर आहे.
चांगली झोप - जे लोक उशिरा झोपतात किंवा पुरेशी झोप घेत नाहीत त्यांच्यात सेरोटोनिनची पातळी कमी असते. म्हणून, लवकर झोपण्याची आणि लवकर उठण्याची सवय लावा. रात्रीची चांगली झोप मनाला आनंदी ठेवते.
योग्य आहार घेणं - दही, दूध, डाळी, काजू आणि बिया यांसारख्या पदार्थांमधे ट्रिप्टोफॅन असतं. सेरोटोनिन तयार करणारं हे संयुग आहे. इडली आणि डोसा आणि घरगुती लोणचं यांसारखे आंबवलेले पदार्थ देखील यासाठी खाऊ शकता. हे आपल्या आतड्यांमध्ये फायदेशीर बॅक्टेरिया वाढवतात, ज्यामुळे सेरोटोनिन देखील वाढतं.
Skin Aging : वृद्धत्वाची चिन्हं लवकर का दिसतात ? शरीरातले बदल कशाचे संकेत आहेत ?
निसर्गात वेळ घालवा - या सर्वांव्यतिरिक्त, दररोज काही वेळ झाडं आणि वनस्पतींमधे घालवण्याची शिफारस करतात. गवतावर अनवाणी चालत जा. हे करताना सुखदायक संगीत ऐकू शकता. यामुळे तुमचा मूड देखील सुधारेल आणि तुम्हाला आनंदी वाटेल असंही योगगुरुंनी सांगितलं आहे.
आनंद बाहेरून येत नाही; तो आतून येतो. आपण निसर्गाशी सुसंगत राहतो आणि निरोगी दिनचर्या पाळतो तेव्हा आपलं मन आपोआप शांत आणि आनंदी होतं. म्हणून, दिनचर्येत या चार सवयींचा समावेश करणं महत्त्वाचं आहे, असंही त्यांनी या व्हिडिओमधे सांगितलं आहे.