Ear Care : कान बंद होण्यावर रामबाण उपाय, बंद कान उघडण्यासाठी या उपयुक्त टिप्स वापरा

Last Updated:

कानात मळ होतोच, पण मळ बराच काळ टिकून राहिला तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. बहुतेकदा, वॉल्साल्वा, लॉवरी किंवा जांभई यामुळे कानाची समस्या दूर होते. पण यानंतरही समस्या कायम राहिली तर डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.

News18
News18
मुंबई : कधीकधी कान अचानक बंद झाल्यासारखं वाटतं, बोलणं नीट ऐकू येत नाही. हा अनुभव तुम्हालाही आला असेल. कान बंद होणं ही एक सामान्य समस्या आहे. कधीकधी विमानात प्रवास करताना, डोंगरावर फिरताना किंवा थंडी वाजत असते तेव्हा कानात पाणी शिरतं, त्यामुळे दाब येऊ शकतो आणि स्पष्टपणे ऐकता येत नाही.
ऑडिओलॉजिस्ट डॉ. क्लिफ ओल्सन यांनी त्यांच्या यूट्यूब चॅनेलवर याबद्दल एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत कान बंद झाले तर काय करायचं याचे तीन सोपे उपाय सांगितले आहेत.
वॉल्साल्वा पद्धत - कान बंद पडला तर तो साफ करण्याचा हा सर्वात सोपा लोकप्रिय मार्ग ऑडिओलॉजिस्टनी सांगितला आहे. बोटांनी नाक बंद करा आणि तोंड बंद ठेवा. आता नाकातून श्वास बाहेर टाकल्याप्रमाणे हळूवारपणे हवा फुंकण्याचा प्रयत्न करा. यामुळे कानातील दाब समान होतो आणि तो उघडतो. पण, हे करताना जास्त जोरात फुंकू नका.
advertisement
लॉवरी पद्धत - ही पद्धत वॉल्साल्वा पद्धतीसारखीच आहे, यासाठी नाक बंद करा आणि एकाच वेळी गिळताना हळूवारपणे फुंकून घ्या. यामुळे आतील कानात हवा सहज पोहोचते आणि अडथळा लवकर दूर होतो.
जांभई - फक्त एकदा किंवा दोनदा खोलवर जांभई द्या. यामुळे युस्टाचियन ट्यूब देखील उघडते आणि हवेचं संतुलन राखलं जातं. कान बंद पडला तर तो स्वच्छ करण्याचा हा सर्वात सोपा मार्ग असू शकतो. या सर्व पद्धतींनंतरही कान बंद वाटत असतील, तर त्यासाठी इतर काही कारणे जबाबदार असू शकतात.
advertisement
उदाहरणार्थ, कानात मळ साचणं, मधल्या कानात द्रवपदार्थ साचणं किंवा अचानक श्रवणशक्ती कमी होणे. घरी उपचार करण्याचा प्रयत्न करण्याऐवजी ताबडतोब ऑडिओलॉजिस्ट किंवा कान, नाक, घसा तज्ज्ञांचा सल्ला घ्या.
कानात मळ होतोच, पण मळ बराच काळ टिकून राहिला तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. बहुतेकदा, वॉल्साल्वा, लॉवरी किंवा जांभई यामुळे कानाची समस्या दूर होते. पण यानंतरही समस्या कायम राहिली तर डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.
advertisement
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Ear Care : कान बंद होण्यावर रामबाण उपाय, बंद कान उघडण्यासाठी या उपयुक्त टिप्स वापरा
Next Article
advertisement
Devendra Fadnavis: CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

View All
advertisement