कानातील प्रमुख संकेत आणि इतर लक्षणे
कानाच्या पाळीवर तिरकी खूण
वैद्यकीय भाषेत याला 'फ्रँक्स साइन' असे म्हणतात. कानाच्या पाळीवर एक तिरकी, खोलवर जाणारी खूण दिसणे, हे हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे निर्माण झाल्याचे संकेत असू शकते.
रक्तप्रवाहात अडथळे
तज्ज्ञांनुसार, कानाच्या पाळीवर ही खूण होण्याचे कारण म्हणजे शरीरातील अपुरा रक्तप्रवाह. ज्या व्यक्तींच्या हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये चरबी जमा होते, त्यांच्या कानाच्या लहान रक्तवाहिन्यांनाही पुरेसा रक्तपुरवठा होत नाही, ज्यामुळे ही खूण तयार होते.
advertisement
छातीत दुखणे किंवा दबाव
हे हृदयविकाराचे सर्वात सामान्य लक्षण आहे. छातीच्या मध्यभागी किंवा डाव्या बाजूला दाब जाणवणे, जडपणा किंवा दुखणे ही लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.
शरीराच्या वरच्या भागात वेदना
हार्ट अटॅक येण्याआधी वेदना छातीतून खांदा, डावा हात, पाठ, मान किंवा जबड्याच्या दिशेने पसरू शकते. काहीवेळा फक्त या भागातच वेदना जाणवते.
धाप लागणे आणि घाम येणे
कोणतेही काम न करता अचानक धाप लागणे, खूप घाम येणे किंवा चक्कर येणे ही लक्षणेही हृदयविकाराची असू शकतात. अनेकदा महिलांमध्ये ही लक्षणे अधिक दिसतात.
पचन बिघडल्यासारखे वाटणे
छातीत होणारी जळजळ, मळमळ किंवा उलटीचा अनुभव अनेक लोक गॅसमुळे होत असल्याचा समज करतात, पण ही लक्षणेही हृदयविकाराची असू शकतात.
कानाच्या पाळीवरील खूण हे केवळ एक संभाव्य लक्षण आहे, ते अंतिम निदान नाही. पण, जर तुम्हाला ही खूण आणि त्यासोबतच इतर कोणतीही लक्षणे जाणवत असतील, तर त्याला गांभीर्याने घ्या. वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेतल्यास आणि तपासणी केल्यास तुम्ही मोठा धोका टाळू शकता. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)