TRENDING:

Beetroot Juice : हिवाळ्यात राहा फिट, निरोगी प्रकृतीसाठी प्या बीटाचा ज्यूस, जाणून घ्या कृती आणि फायदे

Last Updated:

हिवाळ्यात बीटचा रस हा एक रामबाण उपाय आहे. शरीराला अनेक आजारांपासून वाचवण्यासाठी तो प्रभावी आहे. रिकाम्या पोटी बीटचा रस आलं मिसळून पिणं शरीरासाठी खूप फायदेशीर ठरू शकतं. एमडीपीआयनं प्रकाशित केलेल्या अभ्यासानुसार, बीटात नायट्रेटचं प्रमाण लक्षणीय असतं.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : हिवाळा सुरु झालाय. थंड वातावरणात रोगप्रतिकारशक्ती चांगली ठेवणं आवश्यक आहे. कारण अनेकांना थंड वातावरण सहन होत नाही. सर्दी, खोकला, अंगदुखीसारखे त्रास जाणवतात.
News18
News18
advertisement

नेहमीप्रमाणेच हिवाळ्यातही निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी, दिवसाची सुरुवात चांगली करणं अत्यंत महत्वाचं आहे. दिवसाची चांगली सुरुवात केल्यानं शरीर सक्रिय आणि उत्साही राहतं. तुम्हालाही थकवा जाणवत असेल तर या टिप्स महत्त्वाच्या आहेत.

हिवाळ्यात बीटचा रस हा एक रामबाण उपाय आहे. शरीराला अनेक आजारांपासून वाचवण्यासाठी तो प्रभावी आहे. रिकाम्या पोटी बीटचा रस आलं मिसळून पिणं शरीरासाठी खूप फायदेशीर ठरू शकतं. एमडीपीआयनं प्रकाशित केलेल्या अभ्यासानुसार, बीटात नायट्रेटचं प्रमाण लक्षणीय असतं.

advertisement

नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिननं प्रकाशित केलेल्या अभ्यासानुसार, आल्यात रोग-संबंधित जनुकांना रोखण्याची उपचारात्मक क्षमता आहे. मधुमेह, हृदयरोग आणि न्यूरोडीजनरेटिव्ह रोगांसारख्या आजारांवर उपचार करण्यासाठी ते प्रभावी आहे.

Sleep Routine: कमी झोपताय ? जागे व्हा, हे नीट वाचा आणि स्वस्थ झोपा

बीटाचा रस आल्यात मिसळून प्यायल्यानं हृदयाचं आरोग्य सुधारतं, त्वचेचा रंग सुधारतो आणि पचनसंस्था मजबूत होते. बीटरूटमधील अँटीऑक्सिडंट्स रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात. रोगप्रतिकारक शक्ती वाढवल्यानं संसर्ग आणि आजारांपासून संरक्षण होण्यास मदत होते.

advertisement

नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिननं प्रकाशित केलेल्या अभ्यासानुसार, आल्यात व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी६, मॅग्नेशियम, पोटॅशियम, तांबे आणि मॅंगनीजसह अनेक जीवनसत्त्वं आणि खनिजं असतात. त्यात जिंजेरॉल आणि शोगाओल सारखे शक्तिशाली अँटिऑक्सिडंट्स आणि दाहक-विरोधी घटक असतात, ज्यामुळे ते आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरतं.

पचनसंस्थेसाठी उपयुक्त - बीटात फायबरचं प्रमाण जास्त असतं आणि यामुळे आतड्यांच्या हालचालींना मदत होते. शिवाय, आल्याचे पाचक गुणधर्म पचन सुधारतात, बद्धकोष्ठता टाळतात आणि यामुळे पोट फुगण्याचं प्रमाण कमी होतं.

advertisement

No Sugar: साखरेला करा बाय बाय, प्रकृतीत होतील चांगले बदल, वाचा हेल्थ टिप्स

वजन कमी करण्यात प्रभावी - बीटचा रस आणि आलं एकत्र केल्यानं शरीराला डिटॉक्सिफाय करण्यास मदत होते. हे डिटॉक्स ड्रिंक वजन कमी करण्यास देखील मदत करू शकतं, शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास यामुळे मदत होते.

त्वचेसाठी फायदेशीर - बीट आणि आलं त्वचेसाठी फायदेशीर आहेत. यात अँटिऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी असलेल्या रसांमुळे त्वचा उजळते, डाग कमी होतात आणि केसांचं रक्षण होतं.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
‘जिमला जातो म्हणून सांगितलं अन्..' अपघातात ओमकारच्या मृत्यूने आजी ढसाढसा रडली
सर्व पहा

दहा ते पंधरा दिवस बीटचा रस प्या. त्यानंतर, थोडे दिवस पिऊ नका आणि नंतर आठवड्यातून दोन-तीन वेळा बीटचा रस प्या.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Beetroot Juice : हिवाळ्यात राहा फिट, निरोगी प्रकृतीसाठी प्या बीटाचा ज्यूस, जाणून घ्या कृती आणि फायदे
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल