हवामानातील बदलांमुळे या काळात पिंपल्सचा त्रास अधिक वाढतो. हवेतील आर्द्रतेमुळे त्वचेतून जास्त तेल बाहेर येते, ज्यामुळे पिंपल्सची समस्या वाढू शकते. हवामानाशिवाय तुमचा आहार, स्वच्छता आणि प्रदूषण यांसारख्या गोष्टी देखील पावसाळ्यात पिंपल्स वाढण्यास कारणीभूत ठरतात. डॉ. शितू यांनी Healthshots ला या समस्येवर काही खास उपाय सांगितले आहेत.
पिंपल्स टाळण्यासाठी 5 महत्त्वाच्या टिप्स..
advertisement
त्वचेला हळूवारपणे एक्सफोलिएट करा : आठवड्यातून दोन वेळा त्वचेला हळूवारपणे एक्सफोलिएट केल्याने मृत त्वचेच्या पेशी निघून जातात, छिद्रे मोकळी होतात आणि त्वचेला एक नवीन, टवटवीत लुक मिळतो. यामुळे व्हाइटहेड्स, ब्लॅकहेड्स आणि इतर डाग कमी होतात.
मर्यादित मेकअपचा वापर करा : पावसाळ्यात मेकअप जास्त वेळ टिकत नाही. त्यामुळे या काळात जास्त मेकअप वापरू नये. त्याऐवजी तुम्ही हलका, वॉटर-रेसिस्टंट मेकअप वापरू शकता. तसेच रात्री झोपण्यापूर्वी मेकअप काढणे विसरू नका. यामुळे छिद्र बंद होत नाहीत आणि पिंपल्सचा त्रास होत नाही.
सौम्य फेसवॉश वापरा : डॉ. शितू यांच्या मते, 'पावसाळ्यात वातावरणातील आर्द्रता वाढते, ज्यामुळे धूळ, घाम, तेल आणि मेकअपचे कण छिद्रांमध्ये जमा होतात आणि पिंपल्स, ब्लॅकहेड्स आणि व्हाइटहेड्सला जन्म देतात.' त्यामुळे चेहरा वारंवार सौम्य फेसवॉशने स्वच्छ करा.
सनस्क्रीन लावणे विसरू नका : पावसाळ्यातही हानिकारक UVA आणि UVB किरणांपासून त्वचेचे संरक्षण करण्यासाठी तुम्ही नेहमी सनस्क्रीन लावा. यामुळे सनबर्न, टॅनिंग आणि लवकर वृद्धत्व येण्याचा धोका कमी होतो.
त्वचा मॉइश्चरायझ करा : डॉ. शितू यांच्या म्हणण्यानुसार, 'योग्य मॉइश्चरायझरचा वापर केल्यास त्वचेतील नैसर्गिक ओलावा टिकून राहतो आणि तिला पोषण मिळते.' तेलकट त्वचा असलेल्या लोकांनी मॅट फिनिश देणारे मॉइश्चरायझर वापरण्याचा सल्ला दिला जातो.