टिकाऊ आणि आकर्षक
चांदीच्या राख्या फक्त एक दिवसाच्या वापरासाठी नसतात. त्यांची खासियत म्हणजे त्या टिकाऊ असतात आणि आठवणी म्हणून दीर्घकाळ जपल्या जाऊ शकतात. बहिणी आपल्या भावाला केवळ राखीच नव्हे, तर एक अशी भेट देतात जी वर्षानुवर्षे त्याच्याकडे राहते. त्यामुळेच या राख्यांचा भावनिक आणि आर्थिक दोन्ही दृष्टिकोनातून महत्त्व वाढले आहे.
Rakshabandhan 2025: यंदा राखी बाधंण्यासाठी शुभ मुहूर्त कोणता? भद्राकाळ कधी? संपूर्ण माहिती
advertisement
डिझाईन्समध्ये वैविध्य
या राख्यांमध्ये विविध प्रकारच्या नाजूक आणि सुंदर डिझाईन्स उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे, या राख्यांवर श्रीराम, श्रीकृष्ण, ओम, स्वस्तिक, शिवशंकर यांसारखी धार्मिक प्रतीके कोरण्याचा पर्याय असतो. एवढंच नाही तर, तुम्हाला हवे असल्यास राखीवर भावाचे नाव, खास मेसेज किंवा निवडक चिन्ह देखील कोरता येते. त्यामुळे या राख्या पूर्णपणे कस्टमाईज करता येतात.
खिशाला परवडणारी किंमत
चांदी म्हटली की किंमत जास्त असेल असे वाटते, पण या राख्या खिशाला परवडतील अशा किमतीत उपलब्ध आहेत. बाजारात त्यांची किंमत साधारण 300 रुपयांपासून 1500 रुपयांपर्यंत आहे. त्यामुळे सामान्य कुटुंबांपासून प्रीमियम गिफ्ट निवडणाऱ्या ग्राहकांपर्यंत सर्वच लोकांचा कल याकडे वाढत आहे.
सध्याचा चांदीचा दर
श्री गणेश अलंकार ज्वेलर्सचे युवराज नेवलेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या चांदीचा दर प्रतिकिलो 1 लाख 14 हजार रुपये असून, दहा ग्रॅमचा दर 1,140 रुपये आहे. रक्षाबंधनाच्या आठवड्यात मागणी मोठ्या प्रमाणात वाढल्याने, बाजारात चांदीच्या राख्यांचे स्टॉल्स झगमगू लागले आहेत.





