पापड चाट बनवण्यासाठी लागणारे साहित्य
साबुदाणा पापड किंवा आलूचे पापड तळून घेतलेले, शिजवलेला बटाटा, बारीक केलेले चिप्स, अनार दाणे, पिठी साखर, मीठ, लाल तिखट आणि लिंबू हे साहित्य लागेल. तुम्हाला लागत असल्यास आणखी काही साहित्य तुम्ही घेऊ शकता.
advertisement
उपवासाची पापड चाट तयार करण्याची कृती
सर्वात आधी तुम्हाला लागत असलेले पापड तळून घ्यायचे आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार आलू किंवा साबुदाणा पापड घेऊ शकता. त्यानंतर त्यावर शिजवून घेतलेला बटाटा लावून घ्यायचा आहे. त्यानंतर थोडं लाल तिखट टाकून घ्यायचं. मीठ टाकून घ्यायचं. पिठी साखर टाकून घ्यायची.
ते सर्व साहित्य व्यवस्थित लावून झाल्यावर त्यावर बारीक केलेले चिप्स टाकून घ्यायचे. त्यानंतर अनार दाणे टाकून घ्यायचे. चवीपुरतं लिंबू पिळून घ्यायचं. हे सर्व साहित्य टाकून झाल्यानंतर त्यावर पुन्हा लाल तिखट, मीठ आणि पिठी साखर टाकून घ्यायची आहे. चटपटीत अशी उपवासाची पापड चाट तयार झालेली असेल. ही चाट तुम्हाला खाण्याच्या वेळी बनवायची आहे. आधीच बनवून ठेवली तर पापड नरम पडतात.