इन्स्टंट साबुदाणा खिचडी बनवण्यासाठी लागणारे साहित्य
1 वाटी साबुदाणा, शेंगदाणे, तेल, जिरे, कढीपत्ता, मिरची, मीठ, साखर, लिंबू आणि चिरून घेतलेला बटाटा हे साहित्य लागेल.
साबुदाणा खिचडी बनवण्याची कृती
सर्वात आधी शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत. शेंगदाणे भाजून झाल्यानंतर ते थंड होईपर्यंत साबुदाणा बारीक करून घ्यायचा आहे. बारीक करताना एकदम त्याचे पीठ करायचे नाही आणि जास्त जाडसर सुद्धा ठेवायचे नाही. त्यानंतर शेंगदाणे बारीक करून घ्यायचे आहेत. त्यानंतर बारीक केलेला साबुदाणा थोडा ओलसर करून घ्यायचा आहे. त्यासाठी त्याला हलका पाण्याचा शिंपडा द्यायचा आहे. त्यानंतर त्याला बाजूला झाकून ठेवायचा आहे. साबुदाणा थोडा मुरेपर्यंत फोडणी तयार करून घ्यायची आहे.
advertisement
त्यासाठी कढईत तेल टाकून घ्यायचं. त्यानंतर तेल थोडं गरम झालं की त्यात जिरं टाकायचं. त्यानंतर कढीपत्ता आणि मिरची टाकायची आहे. ते थोडं परतवून घेऊन त्यात बटाटे टाकून घ्यायचे आहेत. 10 मिनिटे बटाटे शिजवून घेतल्यानंतर त्यात साबुदाणा टाकून घ्यायचा. त्यानंतर त्यात चवीपुरतं मीठ टाकायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर 5 ते 10 मिनिटे साबुदाणा शिजवून घ्यायचा आहे.
5 ते 10 मिनिटानंतर साबुदाणा शिजलेला असेल. त्यात शेंगदाणा कूट टाकून घ्यायचा आहे. ते सुद्धा व्यवस्थित मिक्स करायचे आहे. त्यानंतर चवीपुरतं लिंबू आणि साखर टाकायची आहे. ते सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर साबुदाणा खिचडी तयार झालेली असेल. ना साबुदाणा भिजवण्याची गरज, ना खूप वेळ वाट पाहण्याची गरज, अगदी झटपट टेस्टी अशी साबुदाणा खिचडी तयार होते.