TRENDING:

Appe Recipe: रोज पोहे, उपीट खाऊन कंटाळा आलाय? नाश्त्याला बनवा ज्वारीचे आप्पे, पाहा हेल्दी रेसिपी

Last Updated:

Jowar Appe: रोजच्या नाश्त्यात पोहे, उपीट खाण्याचा अनेकांना कंटाळा येतो. तेव्हा ज्वारीची पौष्टिक आप्पे उत्तम पर्याय ठरू शकतो.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई: रोज सकाळी नाश्त्याला पोहे आणि उप्पीट खाण्याचा अनेकांना कंटाळा येतो. दिवसभराची ऊर्जा याच सकाळच्या नाश्त्यातूनच मिळते. त्यामुळे झटपट आणि पौष्टिक नाश्त्याच्या शोधात असलेल्या गृहिणींसाठी एक उत्तम पर्याय आहे. आता ज्वारीच्या पिठाचे चवदार आणि हेल्दी आप्पे अवघ्या काही मिनिटांत तयार करता येणार आहेत. मुंबईतील गृहिणी वैशाली कांबळे यांनी ही सोपी रेसिपी सांगितली आहे.
advertisement

ज्वारीचे आप्पे बनवण्यासाठी साहित्य: (२-३ जणांसाठी)

घरात 2 ते 3 जणांसाठी ज्वारीचे आप्पे बनवणार असाल तर अगदी घरातीलच साहित्य लागते. यामध्ये 1 वाटी ज्वारीचे, 1 कप दही, 1 बारीक चिरलेला कांदा, थोडीशी कोथिंबीर, 2 बारीक चिरलेल्या हिरवी मिरची, चवीनुसार मीठ, खाण्याचं तेल, 1 चमचा इनो पावडर (फळांज) एवढ्या साहित्यात अत्यंत पौष्टिक आप्पे बनवता येतात. इनो ऐच्छिक असून आप्पे फुलवण्यासाठी वापरलं जातं.

advertisement

Kitchen Tips : तुमचीही चपाती जाड-कडक होते? कणिक मळल्यावर करा हे काम, चपाती टम्म फुगेल आणि होईल मऊ

ज्वारीचे आप्पे बनवण्याची कृती

सर्वप्रथम एका मोठ्या भांड्यात ज्वारीचे पीठ आणि दही एकत्र करा या मिश्रणात बारीक चिरलेला कांदा, गाजर, कोथिंबीर आणि मीठ घाला आणि त्यात थोडं पाणी घालून पातळसर गोळा तयार करा. शेवटी इनो घालून मिश्रण फुलवा आणि लगेचच आप्पे तव्यावर घालायला सुरुवात करा. गरम तव्यावर प्रत्येक खोलगट भागात थोडं तेल सोडा आणि मिश्रण घालून झाकण ठेवून मध्यम आचेवर शिजवा. एका बाजूने खरपूस झाल्यावर पलटून दुसऱ्या बाजूनेही तसंच शिजवा. मग आपले पौष्टिक आप्पे झटपट तयार होतील. ते टोमॅटो सॉस किवा खोबऱ्याच्या चटणी सोबत खाऊ शकता.

advertisement

टीप: इनो ऐवजी तुम्ही थोडंसं बेकिंग सोडा आणि लिंबाचा रस वापरू शकता. तुम्ही तुमच्या आवडीनुसार पालक, मटार, बीट यासारखा इतर भाजीपाला पण घालू शकता. ज्वारीचे अप्पे हे केवळ झटपट बनणारे नसून ते आरोग्यदायी, फायबरयुक्त आणि ग्लूटेन फ्री देखील आहेत. नाश्ता, डबा किंवा संध्याकाळचा स्नॅक म्हणून उत्तम पर्याय!

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/रेसिपी/
Appe Recipe: रोज पोहे, उपीट खाऊन कंटाळा आलाय? नाश्त्याला बनवा ज्वारीचे आप्पे, पाहा हेल्दी रेसिपी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल