चकली बनविण्यासाठी लागणारे साहित्य
2 वाटी गव्हाचे पीठ, अर्धी वाटी मुगाची डाळ हे दोन्ही साहित्य कुकरमध्ये लावून 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. गव्हाचे पीठ ओले होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. तसेच मुगाची डाळ व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे. हिरवी मिरची आणि कढीपत्त्याची पेस्ट, जिरे, तीळ, ओवा, मीठ, हळद आणि तेल हे साहित्य लागेल.
advertisement
तुम्ही खाताय तो गूळ शुद्ध की अशुद्ध कसा ओळखायचा? या टिप्स करा फॉलो, लगेच येईल लक्षात
चकली बनविण्यासाठी कृती
चकली बनविण्यासाठी सर्वात आधी एका भांड्यात वाफवून घेतलेले पीठ घ्यायचे आहे. त्या पिठातील गोळे हाताने फोडून पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. मिक्स करून झाल्यानंतर त्यामध्ये मुगाची डाळ टाकून घ्यायची आहे. साल असलेली मुगाची डाळ वापरल्यास चकली आणखी चविष्ट बनते. डाळ टाकून घेतल्यानंतर हिरवी मिरची, कडीपत्ता आणि कोथिंबीरची पेस्ट टाकून घ्यायची आहे. त्यानंतर जिरे टाकून घ्यायचे आहे. नंतर ओवा आणि तीळ टाकून घ्यायचे आहे. लगेच मीठ आणि हळद टाकून घ्या. त्यानंतर सर्व साहित्य टाकून घेतले की मिश्रण मिक्स करून घ्यायचे आहे.
मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर त्यात थंड पाणी टाकून त्याचा घट्टसर असा गोळा तयार करायचा आहे. गोळा तयार केल्यानंतर 10 मिनिटे बाजूला ठेवून द्यायचा आहे. 10 मिनिटांनंतर साच्याच्या साहाय्याने चकली बनवून घ्यायची आहे. चकली बनवून झाली की, तळून घ्यायची आहे. त्यासाठी कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचे आहे. तेल गरम झाले की त्यात चकली तळून घ्यायची आहे. चकली तेलात परतवत राहायची आहे. छान रंग येईपर्यंत शिजवून घ्यायची आहे. चविष्ट अशी चकली तयार झालेली असेल. यामध्ये तुम्ही पीठ भिजवण्यासाठी ताक सुद्धा वापरू शकता. त्यामुळे चकलीची चव आणखी छान लागेल.