Jaggery : तुम्ही खाताय तो गूळ शुद्ध की अशुद्ध कसा ओळखायचा? या टिप्स करा फॉलो, लगेच येईल लक्षात

Last Updated:

गुळाचे सेवन हे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. त्यामुळे दैनंदिन जीवनात बऱ्याचदा गुळाचा वापर होतो.

+
गुळाच्या
title=गुळाच्या गोडीत लपलेले रसायन ; शुद्ध गूळ ओळखायचा तर असे करा..! 

/>

गुळाच्या गोडीत लपलेले रसायन ; शुद्ध गूळ ओळखायचा तर असे करा..! 

छत्रपती संभाजीनगर : गुळाचे सेवन हे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. त्यामुळे दैनंदिन जीवनात बऱ्याचदा गुळाचा वापर होतो. गुळाची चहा, कॉफी, सण-उत्सवामध्ये गुळाचे लाडू यांसारख्या विविध खाद्यांमध्ये गूळ वापरला जातो. आजकाल कोणताही पदार्थ जास्त दिवस टिकण्यासाठी त्यात रसायनिक पदार्थांचा वापर केला जातो.
गुळातदेखील रसायनांचा वापर केला जाऊ लागल्याने हा घटक आता आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे? असा प्रश्न नागरिकांना पडला. छत्रपती संभाजीनगर शहर असो किंवा ग्रामीण भागातील बाजारात, रस्त्याच्या कडेला लोडिंग रिक्षा, हातगाड्यांवर मोठ्या प्रमाणात गूळ विक्रेते दिसून येतात. गूळ खरेदी करताना तो भेसळयुक्त तर नाही ना याची शहानिशा करूनच खरेदी करायला हवा, भेसळयुक्त गुळाचे सेवन तुमच्यासाठी गंभीर ठरू शकते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
advertisement
सध्या बाजारात मोठ्या प्रमाणात गूळ विक्रीसाठी आला आहे. थंडीच्या दिवसांत गुळाची विक्री जास्त प्रमाणात होते. गुळामध्ये प्रोटीन, मॅग्नेशियम आणि फायबरसारखे अनेक गुणधर्म असतात, रक्तवाढीसाठीही गूळ फायदेशीर ठरतो. ज्यामुळे तुमचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते. गूळ हा प्रत्येक स्वयंपाकघरात महत्त्वाचा घटक मानला जातो. गुळामुळे कोणत्याही पदार्थाला गोडवा येतो, परंतु साखरेऐवजी गुळाचे नियमित सेवन करणारेही अनेकजण आहेत. मकरसंक्रांतीच्या तिळगुळाच्या लाडूपासून ते दिवाळीच्या लाडूपर्यंत अनेक पदार्थांमध्ये गोडव्यासाठी गुळाचा वापर केला जातो.
advertisement
शुद्ध गूळ कसा ओळखावा?
शुद्ध गुळाची चव गोड असते आणि त्याचा सुगंध मातीसारखा असतो. जर गुळाची चव जास्त गोड आणि केमिकल युक्त असेल तर त्याचे सेवन तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकतं. गरम वातावरणामध्ये शुद्ध गूळ विरघळण्यास सुरुवात होते. भेसळयुक्त गूळ वितळल्यावर पाणी सोडू लागते. शुद्ध गूळ नेहमी गडद रंगाचा असतो. बाजारातील रसायनिक सोनेरी पिवळ्या गुळाचे सेवन करणे शक्य होईल तेवढे टाळा.
advertisement
पिवळ्याधमक गुळाचे गणित जुळवण्यासाठी त्यात केमिकल मिसळले जातात. ज्यामुळे त्याचे नैसर्गिक गुणधर्म नष्ट होतात. शिवाय भेसळयुक्त गुळाचे सेवन केल्यामुळे अनेक गंभीर आजार होण्याचा धोका असतो. तज्ज्ञांनी याबाबत सावधगिरीचा इशारा दिला आहे.
शुद्ध गुळाचा रंग हलका तपकिरी किंवा सोनेरी पिवळा असतो. बाजारात गुळाचा रंग खूप तेजस्वी आणि तुमच्या डोळ्यांना आकर्षित करणारा असतो. पण त्यात कृत्रिम रंगाचा वापर केल्याची शक्यता असते. गुळाची चाचणी करण्यासाठी त्याचा एक छोटा तुकडा पाण्यामध्ये विरघळावा. जर पाण्याचा रंग बदलला तर त्या गुळात रसायनिक रंगाचा वापर केला आहे. शुद्ध गूळ पाण्यात कोणत्याही प्रकारचे रंग सोडत नाही. कधी कधी गुळाच्या ढेपेचं वजन वाढवण्यासाठी त्यामध्ये खडूची पावडर किंवा वॉशिंग सोड्याचा वापर केला जातो. एक छोटा गुळाचा तुकडा पाण्यात मिसळा. पाण्याखाली जर पांढरे थर निर्माण झाले तर तो गूळ भेसळयुक्त आहे.
advertisement
गुळाचा पोत आणि त्याचा कडकपणा त्याची शुद्धता दर्शवतो. शुद्ध गूळ हलका मऊ आणि सहज विरघळणारा असतो. जर गूळ तुमच्या हातावर सहज चिकटत असेल तर तो शुद्ध गूळ आहे. भेसळयुक्त गूळ कडक असतो आणि त्यात साखर क्रिस्टल्स किंवा इतर कृत्रिम रसायने मिसळली जातात. गूळ आकर्षित दिसण्यासाठी आणि जास्त दिवस चांगला टिकवून ठेवण्यासाठी त्यामध्ये सल्फरचा वापर केला जातो. गुळाचा छोटा तुकडा पाण्यात विरघळून त्यात हायड्रोक्लोरिक ॲसिडचे काही थेंब टाका. पाण्यात फोम किंवा बबल्स तयार झाले तर त्यात सल्फर वापर केला आहे.
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Jaggery : तुम्ही खाताय तो गूळ शुद्ध की अशुद्ध कसा ओळखायचा? या टिप्स करा फॉलो, लगेच येईल लक्षात
Next Article
advertisement
Bollywood Movies: हिरोच बनला खलनायक, बॉक्स ऑफिसवर उडवली खळबळ; तिन्हीही ठरले ब्लॉकबस्टर
: हिरोच बनला खलनायक, बॉक्स ऑफिसवर उडवली खळबळ; तिन्हीही ठरले ब्लॉकबस्टर
    View All
    advertisement