नारळ पोळी बनविण्यासाठी लागणारे साहित्य
नारळाचा कीस, 4 ते 5 बदाम, साखर, वेलची, तूप आणि गव्हाचे पीठ हे साहित्य लागेल.
नारळ पोळी बनविण्याची कृती
सर्वात आधी नारळाचा किस आणि बदाम मिक्सरला फिरवून घ्यायचे आहे. त्यानंतर साखर आणि वेलची देखील मिक्सरमधून बारीक करायची आहे. त्यानंतर सारण तयार करायचं आहे. त्यासाठी गॅसवर एका कढईत तूप टाकून घ्यायचे आहे. तूप थोडे गरम झाले की, त्यात नारळाचा किस टाकून घ्यायचा आहे. व्यवस्थित तुपात मिक्स करून सुगंध येतपर्यंत भाजून घ्यायचे आहे. नंतर लगेच त्यात बारीक केलेली साखर टाकून घ्यायची आहे.
advertisement
साखर त्यात व्यवस्थित मिक्स करून त्याला पाणी सुटेपर्यंत फिरवत राहायचं आहे. साखरेला पाणी सुटल्यानंतर 5 मिनिटे आणखी ते सारण शिजवून घ्यायचं आहे. सारण तयार झालं असेल. सारण तयार झाल्यानंतर पोळी लाटून घ्यायची आहे. एक छोटी जाड पोळी लाटायची. नंतर त्यात सारण भरून घ्यायचं आहे. नंतर ती पोळी पुरणपोळी सारखी तयार करून घ्यायची आहे. लाटून तयार झाली की, ती पोळी तव्यावर भाजून घ्यायची आहे.
त्यासाठी तव्यावर आधी थोडे तूप टाकून घ्यायचं आहे. नंतर ती पोळी टाकायची आहे. पोळीला वरून सुद्धा तूप लावून घ्यायचं आहे. एका साईडने पोळी खमंग झाली की, तिला परतवून घ्यायचं आहे. नंतर दुसऱ्या बाजूने देखील पोळी छान शिजवून घ्यायची आहे. अशाप्रकारे नारळ पोळी तयार झाली असेल. ही पोळी नैवेद्य दाखविताना दूध आणि मलाईच्या दहीसोबत वाढू शकता. ही पोळी चवीला अतिशय टेस्टी लागते.





