जवसाची चटणी बनवण्यासाठी लागणारे साहित्य
1 वाटी जवस, 4 ते 5 लसूण पाकळ्या, कडीपत्ता, 3 ते 4 लाल मिरची, चवीपुरतं मीठ आणि जिरे हे साहित्य लागेल.
advertisement
जवसाची चटणी बनवण्याची कृती
सर्वात आधी जवस भाजून घ्यायची आहे. जवस खमंग अशी भाजून घेतली की, चटणी अतिशय टेस्टी बनते. जवस भाजून घेतल्यानंतर ती काही वेळ थंड होऊ द्यायची आहे. थंड झाल्यानंतर जवस आणि इतर साहित्य मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे. त्यासाठी सर्वात आधी मिक्सरच्या भांड्यात जवस टाकून घ्यायची आहे. त्यानंतर लाल मिरची टाकून घ्यायची आहे. त्यानंतर लसूण आणि जिरे टाकून घ्यायचे आहे. त्यांनतर लगेच कडीपत्ता आणि मीठ सुद्धा टाकून घ्यायचं. त्यानंतर हे सर्व मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे.
सर्व मिश्रण व्यवस्थित बारीक करून घ्यायचं आहे. बारीक केल्यानंतर ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. त्यानंतर चटणी खाण्यासाठी तयार होईल. ही चटणी तुम्ही पाट्यावर सुद्धा वाटून घेऊ शकता. त्यामुळे चटणीची चव आणखी छान लागते. ही चटणी बनवल्यानंतर 15 ते 20 दिवस टिकून राहू शकते. जसं जशी चटणी मुरत जाईल तसं तशी त्याची चव आणखी वाढत जाते. तुम्ही नक्की बनवून बघा, पौष्टिक अशी जवसाची चटणी.