TRENDING:

Kadhi Gole Recipe : 1 वाटी चण्याची डाळ, 2 चमचे बेसन, 10 मिनिटांत तयार होतील चविष्ट विदर्भ स्टाईल कढी गोळे, रेसिपी पाहा

Last Updated:

विदर्भ परिसर हा चमचमीत खाण्यासाठी प्रसिद्ध आहे. विदर्भातील कढी गोळे प्रसिद्ध आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
अमिता शिंदे, प्रतिनिधी
advertisement

वर्धा : महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या खाद्य संस्कृती प्रसिद्ध आहेत. विदर्भ परिसर हा चमचमीत खाण्यासाठी प्रसिद्ध आहे. विदर्भातील कढी गोळे प्रसिद्ध आहेत. 10 ते 15 मिनिटांत कढी गोळे बनवून तयार होतात. कढी गोळे विदर्भात कसे बनवले जातात? यासंदर्भातचं आपल्या वर्ध्यातील गृहिणी धनश्री भांडेकर यांनी माहिती दिली आहे.

कढी गोळे बनवण्यासाठी साहित्य 

advertisement

भिजवून घेतलेली 1 वाटी चण्याची डाळ, 1 वाटी दही, 2 चमचे बेसन, तिखट, मीठ, हळद, कढीपत्ता, आलं-लसूण पेस्ट, हिंग, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, जिरे, मोहोरी, कसुरी मेथी आणि तेल हे साहित्य लागेल.

तुरीच्या दाण्यांपासून बनवा स्वादिष्ट वडे, बघा घरगुती रेसिपी, Video

कढी गोळ्याची विदर्भ स्टाईल रेसिपी

सर्वप्रथम भिजवलेली चण्याची डाळ घेऊन त्यात थोडे जिरे, कढीपत्ता, आलं-लसूण पेस्ट, 1-2 हिरव्या मिरच्या अ‍ॅड करून मिक्सर मधून थोडं रवाळ बारीक करून घ्यायचं आहे. आता कढी साठी दह्यात पाणी आणि 2 चमचे बेसन घेऊन चांगलं एकत्र करून घ्यायचं आहे. आता एका कढईत थोडं तेल घालून गरम झाल्यावर त्यात जिरे, मोहोरी, आलं-लसूण पेस्ट, हिरव्या मिरच्या हळद घालून एकत्र केलेलं दही घालून फोडणी द्यायची आहे. आता कढी उकळी येत पर्यंत गोळे तयार करून घ्या.

advertisement

1 ग्लास तांदूळ आणि 1 वाटी चण्याची डाळ; घरीच तयार करा विदर्भ स्टाईल ‘ही’ प्रसिद्ध रेसिपी

मिक्सर मधून बारीक केलेलं मिश्रण घेऊन हातावर थोडं तेल लावून छोटे छोटे गोल गोळे तयार करून घ्या. (काही घरी चपटे गोळे आपल्या आवडीप्रमाणेही बनवतात) आता हे गोळे कढीमध्ये सोडायचे आहेत. दरम्यान कढी झाकू नये. कढी उकळत असताना हे गोळे सोडल्याने कढीचा अर्क गोळ्यात आणि गोळ्याची चव कढीमध्ये उतरल्याने कढी गोळे चविष्ट बनतात. 5 ते 10 मिनिटे उकळून घेतल्यावर गरमागरम कढी गोळे खाण्यासाठी तयार आहे. तुम्ही आवडीप्रमाणे भाकरी,पोळी आणि भाता बरोबर कांदा आणि लोणचे सोबत घेऊन आस्वाद घेऊ शकता.

advertisement

वाफवलेले तुरीचे दाणे आणि शेंगदाण्याचा कूट, कोवळ्या हरभऱ्याच्या पानांची अशी करा घरीच भाजी

कढी गोळे ही रेसिपी लहानांपासून मोठ्यांपर्यंत अगदी आवडीने खाल्ली जाते तुम्ही भाकरी किंवा पोळी सोबत खाऊ शकता तर विदर्भ प्रसिद्ध कढी गोळे तुम्ही देखील एकदा नक्की ट्राय करून बघा

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/रेसिपी/
Kadhi Gole Recipe : 1 वाटी चण्याची डाळ, 2 चमचे बेसन, 10 मिनिटांत तयार होतील चविष्ट विदर्भ स्टाईल कढी गोळे, रेसिपी पाहा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल