मुंबई: आपल्याकडे सणवाराला पुरणपोळीसोबत चिंचेचे पन्हे घेण्याची जुनी पध्दत आहे. लहान मुलं व स्त्रियांमध्ये खास लोकप्रिय असलेली चिंच जिभेवर ठेवताच एक वेगळाच फिल येतो. तोंडाला पाणी सुटण्यासह रुचिप्रदान करणे ही आंबट चिंचेची खासियत आहे. चिंच खाणे आपल्या निरोगी आयुष्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. पाणीपुरी, इमली चटणी, चाट या प्रकारात चवीच्या दृष्टीने चिंच वापरली जाते. उन्हाळ्यात अनेकांना कोल्ड्रिंक आवडत नाहीत. तेव्हा 5 मिनिटांत तयार होणारे पारंपरिक चिंचेचे पन्हे ट्राय करता येतात. मुंबईतील गृहिणी स्मिता कापडणे यांनी चिंच पन्ह्यांची रेसिपी सांगितली आहे.
advertisement
आरोग्यदायी चिंच
चिंच खाणे आपल्या निरोगी आयुष्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. चिंचेपासून बनवलेले पेय हे केवळ चवच वाढवत नाही तर आरोग्य सुधारण्यासाठीही फायदेशीर आहे. चिंचेमध्ये व्हिटॅमिन-सी, व्हिटॅमिन-ए, फॉस्फरस, पोटॅशियम, कॅल्शियम, लोह आणि फायबर हे पौष्टिक घटक असतात. हे घटक आरोग्यास अनेक मार्गांनी मदत करतात. चिंचेमुळे आरोग्याच्या अनेक समस्यांपासून संरक्षण होते. त्यामुळे चिंच ही चवीप्रमाणे आरोग्यालाही उपयुक्त आहे. अशा चिंचेचे उन्हाळ्यामध्ये सरबत स्वरुपात पन्हे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतात.
मेहनत थोडी पण चवीला लय भारी, उन्हाळ्यात असे बनवा तांदळाचे सालपापड, Video
चिंचेचे पन्हे साहित्य
चिंचेचे पन्हे बनवण्यासाठी अगदी कमी साहित्य लागते. चिंच आणि घरच्या साहित्यातच हे पेय तयार होते. चिंचेसोबत, गूळ, मीठ, जिरेपूड, धनेपूड, जलजिरा पावडर हे साहित्य चिंचेचा सरबत किंवा पन्हे बनवण्यासाठी लागेल.
दिवसभर राहाल फ्रेश; उन्हाळ्यात हे सरबत अमृतापेक्षा कमी नाही! Recipe
चिंचेच्या पन्ह्यांची रेसिपी
पहिल्यांदा चिंच पाण्यात भिजत ठेवयाची. भिजल्यावर त्यातील कोळ चाळणीने गाळून घ्यायचा. त्याच प्रमाणे दुसऱ्या एका भांड्यात गूळही भिजत ठेवून तोही गाळून घ्यायचा. त्यानंतर दोन्ही मिश्रण एकत्र करायचं. त्यात चवीनुसार मीठ, जिरेपूड, धनेपूड, जलजिरा मिक्स करून घ्यायचा. अशाप्रकारे अगदी 5 मिनिटांत चिंचेच्या पन्ह्यांची रेसिपी तयार होते. हे पिताना त्यात बर्फ टाकून थंड करू शकता.
दरम्यान, चिंचेचे पन्हे लिंबू सरबताप्रमाणे घरी पाहुणे आल्यावर त्यांच्यासाठीही 5 मिनिटांत बनवू शकता, असे कापडणे सांगतात.