अद्रक कँडीसाठी लागणारे साहित्य
स्वच्छ धुवून आणि कोरडे करून घेतलेले 200 ग्रॅम अद्रक, 2 वाटी साखर आणि वेलची पूड हे साहित्य लागेल.
Mushroom: पावसाळ्यात मशरूम चांगले की खराब, ओळखायचे कसे? विकत घेण्यापूर्वी हे माहिती हवंच!
अद्रक कँडी बनवण्याची कृती
सर्वात आधी अद्रकाची साल काढून घ्यायची आहे. त्यानंतर त्याचे छोटे काप करून घ्यायचे. अद्रकाचे काप शिजवून घ्यायचे. कुकरमध्ये शिजवताना मध्यम आचेवर 1 शिट्टी काढून घ्यायची आहे. कमी आचेवर 10 मिनिटे आणखी शिजवून घ्यायचं आहे. 10 मिनिटानंतर अद्रक शिजलेलं असेल. अद्रक शिजवताना ते एकदम शिजवायचा नाही. फक्त थोड नरम करून घ्यायचं आहे.
advertisement
आता अद्रक कँडीसाठी साखरेचा पाक तयार करून घ्यायचा आहे. त्यासाठी 2 वाटी साखर आणि 1 कप पाणी एका भांड्यात टाकून घ्यायचं. अद्रक शिजवलेलं पाणी तुम्ही यात वापरू शकता. गॅसवर ठेवल्यानंतर पाकातील साखर विरघळेपर्यंत थांबायचं. साखर पूर्णतः विरघळल्यानंतर त्यात अद्रक टाकून घ्यायचं. पाक घट्ट येईपर्यंत त्यात अद्रक शिजवून घ्यायचं आहे. पाक घट्ट आला की त्यात वेलची पूड टाकून घ्यायची.
कॅन्डी तयार झाली असून काहीवेळ सेट होण्यासाठी ठेवायची आहे. 12 तास ही कॅन्डी पाकात अशीच ठेवून द्यायची आहे. 12 तासांनंतर पाक कडक आलेला असेल. कॅन्डी वाळवण्यासाठी पाकातून बाहेर काढावी लागेल. त्यासाठी पाक थोडा गरम करावा लागेल. त्यानंतर एक एक करून सर्व कॅन्डी बाहेर काढून ताटात ठेवायची. ती कॅन्डी 1 ते 2 तास वाळत ठेवायची आहे. 2 तासांनंतर कॅन्डी तयार झालेली असेल. ही कँडी तुम्ही प्रवासात सोबत ठेवू शकता. ज्यांना मोशन सिकनेसचा त्रास आहे. त्या लोकांसाठी ही कॅन्डी अतिशय उपयुक्त ठरते.