TRENDING:

ओल्या मटारची भजी कधी खाल्लेत का? घरीच बनवा सोपी रेसिपी Video

Last Updated:

हिरव्या मटारच्या दाण्यांपासून अतिशय चविष्ट असे भजी बनवता येऊ शकतात.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
वर्धा, 8 डिसेंबर : सध्या हिवाळ्याचे दिवस आहेत. त्यात हिरव्या मटारच्या शेंगा सहज उपलब्ध आहेत. कांदा आणि बटाटा भजी किंवा पकोडे आपण नेहमीच खातो मात्र मटारची भजी कधी खाल्ली आहेत का? तर हिरव्या मटारच्या दाण्यांपासून अतिशय चविष्ट असे भजी बनवता येऊ शकतात. याची रेसिपी वर्धा येथील गृहिणी कुमुद गायकवाड यांनी सांगितली आहे.
advertisement

भजी बनवण्यसाठी साहित्य :

1 वाटी मटार, लांब चिरलेला कांदा, 1 वाटी बेसन, अर्धी वाटी तांदळाचं पीठ, हिरव्या मिरचीची पेस्ट, मीठ, हळद, तिखट, तीळ, ओवा, जिरेपूड आणि तळण्यासाठी तेल हे साहित्य लागेल.

पुरणपोळीचा कंटाळा आलाय? झटपट तयार करा सोजीची गोड पोळी, पाहा रेसिपी Video

भजी बनवण्यसाठी करायची कृती :

advertisement

सर्वप्रथम मटार मिक्सर मधून खरबरीत काढून घ्या. एका भांड्यात हे मिश्रण काढून आता यात चिरलेला कांदा, हिरव्या मिरचीची पेस्ट, हळद, मीठ, तीळ, ओवा, जिरेपूड अ‍ॅड करून कडकडीत तेलाचं मोहन घालायचंय. यात तुम्ही कस्तुरी मेथी आणि मेथीच्या दाण्यांची पूड तसेच कढीपत्ता बारीक करून अ‍ॅड करू शकता. हे मिश्रण चांगलं एकत्र करून घ्या. आता हे मिश्रण तळण्यासाठी तयार आहे. तेल गरम झालं आहे. आता छान भजे तळून घ्या. कुरकुरीत लालसर होईपर्यंत तळून झाल्यानंतर आता काढून घेऊन गरमागरम भजे सर्व्ह करून घ्या. टोमॅटो सॉस किंवा खोबऱ्याची चटणी तुमच्या आवडत्या चटणीसोबत हे पकोडे तुम्ही खाऊ शकता,असं कुमुद गायकवाड यांनी सांगितलं.

advertisement

2 वाटी मैदा, 1 वाटीभर ओले तुरीचे दाणे; घरगुती पद्धतीनं अशी तयार करा कचोरी

गोड मटार कच्चे खाणे अनेकांना आवडतं. तसेच हिरवे मटार वेगवेगळ्या पद्धतीने वापरून चविष्ट पदार्थ बनवला जातो. तसाच एक पदार्थ म्हणजे ओल्या मटारची भजी. अगदी सहज उपलब्ध असलेल्या वस्तू आपल्याला लागल्या आहेत. ओले हिरवे मटार, चणाडाळीचं पीठ, तांदळाचे पीठ, हिरव्या मिरचीची पेस्ट, हळद, मीठ, जिरेपूड, कोथिंबीर, तीळ, ओवा, त्यात तुम्ही धणेपूड आणि आलं लसूण पेस्ट, कढीपत्ता हे देखील अ‍ॅड करू शकता. पाण्याने हे मिश्रण एकत्र घट्ट तयार करून गरमागरम भजी तळून घ्यावीत. तुम्ही देखील थंडीच्या वातावरणात ही रेसिपी नक्कीच ट्राय करून बघा.

advertisement

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/रेसिपी/
ओल्या मटारची भजी कधी खाल्लेत का? घरीच बनवा सोपी रेसिपी Video
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल