याबाबत, महिला आरोग्य प्रशिक्षक निधी कक्कर यांनी तिच्या इंस्टाग्राम हँडलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. एरंडेल तेल योग्य पद्धतीनं चेहऱ्यावर लावलं तर फक्त दोन आठवड्यात चेहऱ्याच्या रंगात लक्षणीय फरक दिसून येतो असंही त्यांनी या व्हिडिओत सांगितलं आहे.
Hair Loss : केस गळतायत ? या कारणांमुळेही गळू शकतात केस, वाचा सविस्तर
advertisement
डोळ्यांवरील काळी वर्तुळं आणि फुगीरपणापासून आराम - डोळ्यांभोवती एरंडेल तेल लावून हलक्या हातानं मालिश केल्यानं काळी वर्तुळं आणि फुगीरपणा कमी होण्यास मदत होते. या तेलात रिसिनोलिक एसिड असतं, यामुळे रक्ताभिसरण सुधारतं आणि जळजळ कमी होते. झोपण्यापूर्वी थोडंसं तेल लावून मालिश केल्यानं डोळे ताजेतवाने होण्यास मदत होते.
जाड पापण्या आणि भुवया - पापण्या पातळ असतील तर एरंडेल तेल नैसर्गिक सीरम म्हणून काम करू शकतं. त्यातील व्हिटॅमिन ई आणि ओमेगा-6 फॅटी एसिड केसांना पोषण देतात आणि मजबूत करतात. दररोज रात्री पापण्या आणि भुवयांना थोडंसं तेल लावा आणि तसंच राहू द्या; काही आठवड्यांत फरक दिसून येईल.
त्वचा हायड्रेटेड आणि मऊ ठेवते - एरंडेल तेलाची सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ते ओलावा टिकवून ठेवणं. या तेलामुळे त्वचा आतून हायड्रेटेड राहते आणि तिला मऊ,राहते. हे तेल विशेषतः कोरडी त्वचा असलेल्यांसाठी फायदेशीर ठरू शकतं.
Arthritis : जास्त वेळ बसू नका, संधिवाताचा धोका ओळखा, वाचा या हेल्थ टिप्स
सुरकुत्या आणि काळे डाग कमी होतात - एरंडेल तेलातले अँटीऑक्सिडंट्समुळे बारीक रेषा आणि सुरकुत्या ही वृद्धत्वाची लक्षणं कमी करण्यास मदत होते. नियमित वापरामुळे काळे डाग आणि रंगद्रव्य कमी होण्यास देखील मदत होऊ शकते.
तेल लावण्यासाठी रात्री चेहरा पूर्णपणे स्वच्छ करा, नंतर थोड्या प्रमाणात एरंडेल तेल घ्या, चेहऱ्यावर हलक्या हातानं मसाज करा. ते रात्रभर तसेच राहू द्या आणि सकाळी साध्या पाण्यानं धुवा. त्वचा खूप संवेदनशील असेल, तर प्रथम पॅच टेस्ट नक्की करा. एरंडेल तेल हे एक स्वस्त, नैसर्गिक आणि प्रभावी उपाय आहे जे तुमच्या त्वचेला नैसर्गिक चमक आणि निरोगी स्पर्श देते. तर, तुम्ही आजच हा उपाय वापरून पाहू शकता.