नॉर्मल स्किन म्हणजे त्वचेचा सर्वात संतुलित प्रकार. जी ना खूप तेलकट असते ना खूप कोरडी. अशा त्वचेची काळजी घेणं तसं तुलनेने सोपं असतं, पण तरीही योग्य रूटिन आणि प्रोडक्ट वापरणं आवश्यक आहे जेणेकरून त्वचेचं नैसर्गिक सौंदर्य दीर्घकाळ टिकून राहिल. सामान्यपणे ड्राय आणि आइली स्किनसाठी वेगवेगळे प्रोडक्ट असतात आणि त्याचं स्किन केअर रूटिनही वेगळं असतं. नॉर्मल स्किनसाठी ड्राय आणि ऑईली स्किन केअर रूटिन फॉलो करून चालणार नाही. त्याचा परिणाम दिसून येणार नाही.
advertisement
तुमच्या त्वचेसाठी योग्य स्किनकेअर रूटीन कोणते? तज्ज्ञांचा सल्ला आणि सोप्या टिप्स!
सकाळचं स्किन केअर रूटिन
फेसवॉश : सकाळी उठल्या उठल्या सगळ्यात आधी चेहरा स्वच्छ करा. यासाठी सौम्य फेस वॉश वापरा. यामुळे त्वचेवरील तेल, घाम दूर होईल.
टोनर : त्वचेचा पीएच स्तर संतुलित ठेवतो आणि त्वचेचे पोर्स घट्ट करतो.
सीरम : यामुळे त्वचा उजळते आणि हायड्रेशन टिकून राहतं. नॉर्मल त्वचेसाठी तुम्ही Hyaluronic Acid किंवा Vitamin C युक्त सीरम वापरू शकता.
मॉइश्चरायझर : हलकासा, नॉन-ग्रीसी मॉइश्चरायझर वापरावा.
सनस्क्रीन : सूर्याच्या UV किरणांपासून त्वचेला संरक्षण देणं खूप महत्त्वाचं आहे. SPF 30 किंवा त्याहून अधिक असलेला सनस्क्रीन निवडा.
रात्रीचा स्किन केअर रूटिन
मेकअप रिमूव्हर / क्लींजिंग ऑईल : दिवसभराचा मेकअप, धूळ, प्रदूषण स्वच्छ करण्यासाठी क्लींजिंग करणं आवश्यक आहे.
फेस वॉश : दिवसाप्रमाणेच रात्रीही सौम्य फेसवॉशने चेहरा धुवा.
टोनर : टोनर वापरणे त्वचेला थंडावा देतं आणि स्वच्छतेची भावना देतं.
सीरम : रात्री Retinol किंवा Hyaluronic Acid युक्त सीरम वापरल्यास त्वचा नव्याने उजळते आणि सुरकुत्या पडत नाहीत.
नाईट क्रीम : रात्री त्वचेची दुरुस्ती होते, म्हणून nourishing नाईट क्रीम वापरणं उपयुक्त आहे.
संवेदनशील त्वचेसाठी परफेक्ट रूटीन! सकाळी आणि रात्री काय कराल? तज्ज्ञ सांगतात...
ही झाली नॉर्मल त्वचेची रोजची काळजी. ज्यासाठी तुम्हाला फार वेळ लागणार नाही. पण असे काही स्किन केअर रूटिन आहेत, ज्याला थोडा जास्त वेळ लागतो. त्या तुम्हा आठवड्यातून एकदा आणि महिन्यातून एकदा करू शकता. त्या कोणत्या ते पाहुयात.
वीकली रूटिन
स्क्रब : आठवड्यातून 1-2 वेळा स्क्रब वापरा. हे मृत त्वचा काढून टाकते.
फेस मास्क : नैसर्गिक घटक असलेला फेस मास्क वापरा. यामुळे त्वचा ताजीतवानी आणि मऊ होते.
त्वचेची काळजी फक्त वरूनच नाही तर आतूनही घ्यायला हवी. म्हणजे खाण्यापिण्याच्या बाबतीतही काळजी घ्यायला हवी. कारण आपण काय खातो, पितो त्याचा परिणाम आपल्या त्वचेवरही होत असतो.
नॉर्मल त्वचेसाठी काही टिप्स
दररोज भरपूर पाणी प्या किमान 8-10 ग्लास.
प्रक्रिया केलेले किंवा तळलेले पदार्थ कमी खा.
किमान 7-8 तास पूर्ण झोप घ्या
रोजचा स्किनकेअर रूटिन नियमित ठेवा.
स्ट्रेस कमी ठेवा, याचा त्वचेवर मोठा परिणाम होतो.