पाटणा, 27 डिसेंबर : आपली त्वचा तेलकट असली, रखरखीत असली, तरीही थंडीत तिचे जे हाल व्हायचे असतात ते होतातच. कितीही सुंदर व्यक्तीला थंडीतला कोरडेपणा चूकलेला नाही. त्यामुळे या ऋतूत काळजी घेणं हा एकमेव उपाय असतो. काळजी घ्यायची म्हणजे महागडे प्रॉडक्ट्स वापरायचे, महागड्या ब्युटी ट्रिटमेंट्स घ्यायच्या असा त्याचा अर्थ होत नाही, तर आपण घरच्या घरीही त्वचेची उत्तम काळजी घेऊ शकता.
advertisement
स्किन केयर एक्सपर्ट सुनीता सांगतात, सर्वात महत्त्वाचं म्हणजे चेहरा धुवणे. साध्या पाण्याने दिवसातून 4 ते 5 वेळा आपण चेहरा धुवायला हवा. आपली त्वचा अति रखरखीत झाली असेल, तर आपण चेहऱ्याला दूधाचा मसाजही करू शकता. त्वचा मूळातच तेलकट असल्यास आपण गुलाबपाण्याचा वापर करू शकता.
तरुणपणी हृदयविकाराचा झटका, काय आहे नेमकी कारणं?, छातीत दुखत असेल तर करा हा उपाय
भरपूर पाणी प्यावं!
सुनीता सांगतात, त्वचेला नैसर्गिक तेज देण्याचं काम पाणी करतं. शिवाय पाण्यामुळे शरीर ऊर्जावान राहतं आणि आपला मूडही फ्रेश राहतो. त्यामुळे नैसर्गिकरित्या शरिरातील घाण बाहेर फेकली जाते. परिणामी पोट साफ झाल्यामुळे त्वचादेखील नितळ राहते.
दरम्यान, आपण मुलतानी माती आणि गुलाब पाण्याचा लेप तयार करून तोदेखील त्वचेवर लावू शकता. त्याचबरोबर मध, हळद, बेसन आणि दूधापासून तयार केलेलं लेप लावल्यास त्वचेवर तेज येतं.
लेटेस्ट बातम्या आणि व्हिडीओ पाहण्यासाठी न्यूज18 लोकमतच्या या अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनलला करा फॉलो...या लिंकवर क्लिक करा https://whatsapp.com/channel/0029Va7W4sJI7BeETxLN6L0g