TRENDING:

Skin Care : मेकअप केला तर त्वचेचं नुकसान होतं का ? चेहऱ्याची काळजी कशी घ्यावी ? वाचा ब्युटी टिप्स

Last Updated:

मेकअपमुळे त्वचेचं नुकसान होत नाही, पण मेकअप नीट काढला जात नसेल तर त्वचेचं नुकसान होऊ शकतं. त्वचेची काळजी योग्य पद्धतीनं घेतली नाही तर त्वचेवर परिणाम दिसतात.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : कामानिमित्त किंवा कधी बाहेर जाताना मेकअप करत असाल तर या टिप्स महत्त्वाच्या आहेत. मेकअपमुळे चेहरा चांगला दिसतो. काही जणींना बेसिक टचअप आवडतं तर काहींना पूर्ण मेकअप. प्रश्न असा की, रोज मेकअप केल्यानं चेहऱ्यावर काही परिणाम होतो का ?
News18
News18
advertisement

रोज मेकअप करत असाल तर सौंदर्यतज्ज्ञांनी दिलेल्या टिप्स नक्की वाचा. चेहऱ्याची काळजी योग्यरित्या घेत असाल तर दररोज मेकअप करूनही त्वचेचं कोणतंही नुकसान होत नाही असं सौंदर्य तज्ज्ञ शहनाज हुसेन यांनी सांगितलंय.

Heel Pain: टाचा का दुखतात ? कारणं समजून घ्या, उपचार करणं होईल सोपं

मेकअपमुळे त्वचेचं नुकसान होत नाही, पण मेकअप नीट काढला जात नसेल तर त्वचेचं नुकसान होऊ शकतं. त्वचेची काळजी योग्य पद्धतीनं घेतली नाही तर त्वचेवर परिणाम दिसतात.

advertisement

मेकअप लावून कधीही झोपू नका. यामुळे चेहऱ्यावरची छिद्रं बंद होतात, मुरुमं आणि ब्लॅकहेड्सचा धोका वाढतो आणि कालांतरानं त्वचा निस्तेज दिसू शकते. तेल-आधारित म्हणजेच ऑईल बेस्ड मेकअप रिमूव्हर वापरा किंवा कापसावर थोडं ऑलिव्ह ऑइल लावा आणि मेकअप हळूवारपणे पुसून काढा. मेकअप काढल्यानंतर, काही कण किंवा तेल त्वचेवर राहू शकते.

Micronutrients: जीवनसत्त्वं, खनिजांची कमतरता, शरीरावर काय परिणाम होतात ?

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
स्वप्नांचा झाला 'लाल चिखल', टोमॅटोला भाव नसल्यामुळे 2.50 लाखांचं नुकसान, Video
सर्व पहा

यासाठी सौम्य फेसवॉशनं चेहरा स्वच्छ करणं महत्वाचं आहे. यामुळे त्वचा स्वच्छ राहते. मृत त्वचा काढून टाकण्यासाठी आणि चेहऱ्यावरची छिद्रं साफ करण्यासाठी आठवड्यातून एक-दोन वेळा चेहरा स्क्रब करू शकता. या सर्वांव्यतिरिक्त, त्वचेला नेहमीच हायड्रेशनची आवश्यकता असते. म्हणून, चांगलं मॉइश्चरायझर वापरा. ​​यामुळे त्वचेतील ओलावा टिकून राहण्यास मदत होते असा सल्लाही सौंदर्यतज्ज्ञांनी दिला आहे.

advertisement

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Skin Care : मेकअप केला तर त्वचेचं नुकसान होतं का ? चेहऱ्याची काळजी कशी घ्यावी ? वाचा ब्युटी टिप्स
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल