नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनने केलेल्या एका अभ्यासानुसार, पुरेशी झोप न मिळाल्यास चयापचयाच्या समस्या, वजन वाढणे आणि लठ्ठपणा यांचा धोका वाढतो. याव्यतिरिक्त, अपुऱ्या झोपेमुळे जास्त कॅलरी आणि कार्बोहायड्रेट असलेले पदार्थ खाण्याची इच्छा वाढते, ज्यामुळे वजन वाढते.
अपुरी झोप आणि वजन कमी होणे यातील संबंध..
भूक नियंत्रणात ठेवण्यास मदत करते : नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिननुसार, जे लोक पुरेशी झोप घेत नाहीत, त्यांची भूक आणि कॅलरीचे सेवन वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे चांगली झोप घेतल्यास भूक नियंत्रणात राहते, जे वजन कमी करण्यासाठी खूप महत्त्वाचे आहे.
advertisement
रात्री उशिरा खाल्ले जात नाही : अभ्यासानुसार असे दिसून आले आहे की, रात्री उशिरापर्यंत जागे राहिल्याने खाण्याची वेळ वाढते आणि यामुळे वजन वेगाने वाढू शकते. म्हणून वेळेवर झोपल्यास रात्री उशिरा खाणे टाळता येते.
चयापचय सुधारते : पुरेशी झोप घेतल्याने शरीराचे चयापचय सुधारते, जे झोप कमी झाल्यामुळे बिघडते. चांगली झोप घेतल्यास शरीराचा 'रेस्टिंग मेटाबॉलिक रेट' सुधारतो. हा दर म्हणजे शरीर विश्रांती घेत असताना किती कॅलरी जाळू शकते, याचे प्रमाण असते.
अस्वीकरण : या बातमीत दिलेली माहिती आणि आरोग्याशी संबंधित सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून, डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच काहीही वापरा. त्याच्या वापरामुळे होणाऱ्या कोणत्याही नुकसानासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.