मूत्रपिंड म्हणजे आपल्या शरीरातील महत्त्वाचा अवयव. रक्त शुद्ध करण्यासाठी, विषारी पदार्थ काढून टाकण्यासाठी आणि पाणी आणि खनिज संतुलनासाठी किडन्यांचं कार्य महत्त्वाचं असतं. खाण्याच्या चुकीच्या सवयी, अपुरं पाणी पिणं आणि जीवनशैलीशी संबंधित आजारांमुळे मूत्रपिंडाच्या समस्या झपाट्यानं वाढतायत. म्हणून, योग्य आहार घेतल्यानं मूत्रपिंडांचं आरोग्य दीर्घकालीन चांगलं राखण्यासाठी मदत होऊ शकते.
तज्ज्ञांच्या मते, काही पदार्थ मूत्रपिंडाच्या आरोग्यासाठी विशेष फायदेशीर मानले जातात. नेफ्रोलॉजिस्ट डॉ. विक्रम कालरा यांनी मूत्रपिंडांचं आरोग्य राखण्यासाठी काय करावं आणि आहारात कोणते पदार्थ समाविष्ट करावेत याविषयी माहिती दिली आहे.
advertisement
मूत्रपिंडं निरोगी ठेवण्यासाठी संतुलित आणि पौष्टिक आहार आवश्यक आहे. सूज कमी करणारे आणि मूत्रपिंडांवर अतिरिक्त ताण न देणारे पदार्थ आहारात असणं महत्त्वाचं आहे.
सफरचंद - सफरचंद मूत्रपिंडांसाठी फायदेशीर मानले जातात. त्यात फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, जे सूज कमी करण्यासाठी मदत करतात. कोलेस्ट्रॉल आणि रक्तातील साखर नियंत्रित करण्यास देखील मदत करू शकतात.
लसूण - मूत्रपिंडांसाठी लसूण देखील चांगले मानले जातात. त्यात दाहक-विरोधी गुणधर्म आहेत जे शरीरातील दाह कमी करण्यास मदत करू शकतात. आहारातील सोडियम कमी करण्यासाठी याची मदत होते.
मेथी, भोपळा आणि झुकिनी यासारख्या हिरव्या पालेभाज्या देखील मूत्रपिंडाच्या आरोग्यासाठी फायदेशीर मानल्या जातात. त्यामत अनेक आवश्यक जीवनसत्त्वं आणि खनिजं असतात, यामुळे शरीराला पोषण देतात आणि मूत्रपिंडांचं कार्य उत्तम राखण्यास मदत करतात.
द्राक्षं आणि डाळिंब यांसारखी फळं देखील मूत्रपिंडासाठी फायदेशीर मानली जातात. त्यातील अँटीऑक्सिडंट्स शरीराला मुक्त रॅडिकल्सपासून संरक्षण करण्यासाठी आणि पेशी निरोगी ठेवण्यासाठी मदत करतात.
मूत्रपिंडांसाठी पुरेशा प्रमाणात पाणी पिणं देखील खूप महत्वाचं आहे. पाणी शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यासाठी मदत करतं आणि मुतखड्याचा धोका कमी करू शकतं.
काय टाळणं आवश्यक - मूत्रपिंड निरोगी ठेवण्यासाठी, फक्त योग्य अन्न खाणं पुरेसं नाही; तर काही पदार्थ टाळणं देखील महत्त्वाचं आहे. जास्त मीठ, जंक फूड आणि प्रक्रिया केलेले पदार्थ खाल्ल्यानं मूत्रपिंडांवर अतिरिक्त ताण येऊ शकतो, म्हणून ते मर्यादित प्रमाणात सेवन केले पाहिजेत. निरोगी आहारासोबतच नियमित व्यायाम, पुरेशी झोप आणि नियमित आरोग्य तपासणी देखील मूत्रपिंडांचं आरोग्य राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात.
