पचन सुधारते : पपईची पाने, मग ती ताजी असोत किंवा वाळलेली, पचनासाठी खूप फायदेशीर असतात. यामुळे पचनक्रिया सुधारते.
त्वचेसाठी उत्तम : तैवान पपई त्वचा निरोगी आणि ताजीतवानी ठेवते.
हृदयासाठी फायदेशीर : तैवान पपईमधील नैसर्गिक घटक हृदय निरोगी ठेवतात. पपईमधील फायबर खराब कोलेस्ट्रॉल कमी करते, तर पोटॅशियम रक्तदाब नियंत्रणात ठेवते. यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो.
advertisement
वजन कमी करण्यास मदत : तैवान पपईमध्ये कॅलरीज कमी असतात आणि फायबर जास्त असते. त्यामुळे ज्यांना वजन कमी करायचे आहे, त्यांच्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे.
मधुमेह नियंत्रणात : पपईमधील अँटीऑक्सिडंट्समुळे मधुमेहाचा धोका कमी होतो, असे अन्न तज्ज्ञ डॉ. नेवपूरकर सांगतात. पोटॅशियममुळे रक्तदाबही नियंत्रणात राहतो.
हे ही वाचा : सावधान! घरात चुकूनही ठेवू नका 'या' गोष्टी, अन्यथा नशिबावर होतो वाईट परिणाम अन् घरात येते आर्थिक तंगी
हे ही वाचा : तरुणींनो, जंक फूड खाताय? सावधान! होऊ शकतो गर्भाशयाच्या कॅन्सरचा धोका, आवर्जुन आहारात करा हे बदल