TRENDING:

Parenting Tips : विचित्र वाटतील... पण मुलांच्या 'या' सवयी असू शकतात बुद्धिमान व्यक्तीचे लक्षण!

  • Published by:
Last Updated:

Reason Behind Strange Behavior Of Child : कधीकधी तुमचे मूल तुम्हाला विचित्र वाटणाऱ्या गोष्टी करते का? जसं की तोच प्रश्न वारंवार विचारणे, एखाद्या विषयावर खोलवर बोलणे किंवा त्याच्या वयापेक्षा मोठ्या वाटणाऱ्या गोष्टींमध्ये रस दाखवणे? जर हो, तर या कृती केवळ खोडसाळपणा नसून प्रतिभावान मुलांची लक्षणे असू शकतात.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : मुलांचं वागणं खरं तर कधीच एकसारखं नसत. परिस्थितीनुसार आणि त्यांच्या मूडनुसार ते कसं वागतील हे ठरतं. पण कधीकधी मुलांच्या काही सवयी आपल्याला त्यांच्याविषयी खास काहीतरी सांगून जातात. बऱ्याचदा त्यांचं वागणं आपल्या विचित्र वागू शकत. पण त्यामागे काय कारण आहे हे जाणून घेणं रंजक ठरेल. आज आम्ही तुम्हाला मुलांच्या अशाच काही विचित्र वाटणाऱ्या पण विशेष सवयींबद्दल सांगणार आहोत.
प्रतिभावान मुलांची वैशिष्ट्ये
प्रतिभावान मुलांची वैशिष्ट्ये
advertisement

कधीकधी तुमचे मूल तुम्हाला विचित्र वाटणाऱ्या गोष्टी करते का? जसं की तोच प्रश्न वारंवार विचारणे, एखाद्या विषयावर खोलवर बोलणे किंवा त्याच्या वयापेक्षा मोठ्या वाटणाऱ्या गोष्टींमध्ये रस दाखवणे? जर हो, तर या कृती केवळ खोडसाळपणा नसून प्रतिभावान मुलांची लक्षणे असू शकतात. उदाहरणार्थ, 8 वर्षांच्या आर्यनला त्याच्या अभ्यासक्रमाबाहेरील गणितातील समस्या सोडवणे आवडते. तो तासनतास कोडी सोडवायचा आणि नवीन गोष्टींबद्दल प्रश्न विचारायचा. सुरुवातीला त्याच्या पालकांना हे विचित्र वाटले, परंतु नंतर त्यांना लक्षात आले की ते त्याच्या प्रतिभेचा भाग आहे.

advertisement

प्रतिभावान व्यक्तीची अशी कोणतीही ठोस व्याख्या नाही. परंतु वेबएमडीनुसार, 1940 मध्ये केलेल्या एका संशोधनात असे आढळून आले की, प्रतिभावान व्यक्तीचा बुद्ध्यांक 180 पर्यंत असू शकतो. हा आकडा 10 लाख लोकांपैकी एका व्यक्तीचा असू शकतो. अशा मुलांचे वर्तन आणि कौशल्ये सामान्य मुलांपेक्षा खूपच वेगळी आणि अद्वितीय असतात. त्यांना योग्यरित्या समजून घेऊन आणि प्रोत्साहन देऊन, तुम्ही त्यांची बुद्धी तीक्ष्ण करू शकता. त्याचबरोबर त्यांच्या सर्जनशीलतेला देखील प्रोत्साहन देऊ शकता. चला, अशा मुलांना ओळखण्याचे मार्ग आणि त्यांच्या संगोपनासाठी खास टिप्स जाणून घेऊया.

advertisement

प्रतिभावान मुलांची ओळख काय?

लवकर शिकण्याची क्षमता : प्रतिभावान मुलं कोणतीही गोष्ट खूप लवकर शिकतात. नवीन गोष्टी समजून घेण्यासाठी आणि आत्मसात करण्यासाठी त्यांना जास्त वेळ लागत नाही. इतर मुलांना एखादा विषय समजून घेण्यासाठी वेळ लागतो, परंतु ही मुलं कमी वेळेत तीच गोष्ट तपशीलवार जाणून घेतात.

खोलवर जाणून घेण्याचा आग्रह : अशी मुलं केवळ वरवर काहीही समजून घेत नाहीत. तर ती पूर्णपणे सखोल जाणून घेऊ इच्छितात. त्यांना एखाद्या विषयाची संपूर्ण माहिती मिळेपर्यंत ते तिचा पाठपुरावा सोडत नाहीत.

advertisement

नवीन गोष्टी जाणून घेण्याची उत्सुकता : प्रतिभावान मुलांना नवीन गोष्टी जाणून घेण्याची आवड असते. त्यांना प्रत्येक विषयावर बरेच प्रश्न असतात आणि त्यांना नवीन माहिती मिळवण्यात आनंद मिळतो.

सर्जनशील उपाय शोधणे : अशी मुलं समस्या सोडवण्याचे नवीन मार्ग शोधतात. पाठ्यपुस्तकातील सूत्रांवर अवलंबून राहण्याऐवजी, ते त्यांच्या स्वतःच्या पद्धतीने उपाय शोधतात.

अधिक संवेदनशील असतात : प्रतिभावान मुलं भावनिकदृष्ट्या संवेदनशील असतात. ते इतरांच्या भावना खोलवर जाणतात. कधीकधी ते एकटे राहून कोडी, बुद्धिबळ किंवा मानसिक खेळ खेळणे पसंत करतात.

advertisement

स्व-शिक्षणाची सवय : ही मुलं स्वावलंबी असतात आणि स्वतःहून शिकण्याची सवय विकसित करतात. त्यांना जास्त मार्गदर्शनाची गरज नसते. कारण ते स्वतःहून गोष्टी समजून घेण्याचा आणि करण्याचा प्रयत्न करतात.

मुलांना सपोर्ट कसे करावे?

जर तुमच्या मुलामध्ये या सवयी दिसल्या तर त्यांना जास्त अडवू नका. त्यांच्या कुतूहलाला प्रोत्साहन द्या आणि त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करा. त्यांना नवीन गोष्टी शिकण्याची आणि समजून घेण्याची संधी द्या. योग्य दिशा आणि पाठिंब्याने, मुलाची बुद्धिमत्ता आणखी चमकू शकते. तुमच्या मुलांमध्ये असे खास गुण असतील तर ती आनंदाची गोष्ट आहे! फक्त त्यांना योग्य वातावरण द्या आणि त्याची प्रतिभा फुलू द्या.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Parenting Tips : विचित्र वाटतील... पण मुलांच्या 'या' सवयी असू शकतात बुद्धिमान व्यक्तीचे लक्षण!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल