जंपिंग जॅक - हा कार्डिओ व्यायाम वॉर्म अप करण्यासाठी उपयुक्त आहे. यामुळे हृदयाचे ठोके वाढतात, रक्ताभिसरण सुधारतं आणि यामुळे शरीर संपूर्ण सक्रिय राहतं. व्यायाम जंपिंग जॅकनं सुरू करू शकता.
बर्पीज - बर्पीज हा व्यायाम, एकाच वेळी अनेक स्नायूंसाठी उपयुक्त आहे. यात स्क्वॉट्स, पुश-अप्स आणि जंप करतात. दहा-पंधरा मिनिटं बर्पीज केल्यानं कॅलरीज बर्न होतात आणि स्टॅमिना सुधारतो.
advertisement
Oily Hair : या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे केस होतात चिकट, जाणून घ्या उपाय
हाय नीज - High Knees - एकाच ठिकाणी उभं राहून गुडघे वेगाने वर करणे. या व्यायामामुळे पोट आणि पायांची विशेषतः पोटातील चरबी वेगानं कमी होण्यास मदत होते, यामुळे हृदय आणि रक्तवाहिन्यासंबंधी सहनशक्ती देखील मजबूत होते.
जंपिंग स्क्वॅट्स - जंपिंग स्क्वॅट्समुळे कॅलरीज लवकर बर्न होतात, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.
प्लँक - प्लँकमुळे विशेषतः कंबरेभोवतीची चरबी कमी होण्यास मदत होते.
दोरी उडी - दोरी उडी हा वजन कमी करण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे. या व्यायाम प्रकारात हृदयाचे ठोके वाढतात, कॅलरीज लवकर बर्न होतात आणि शरीर सुडौल राहण्यास मदत होते.
Garlic Benefits : लसणाचे आरोग्यकारक फायदे, त्वचेच्या अनेक समस्यांपासून मिळेल आराम
सूर्य नमस्कार - सूर्यनमस्कार ही बारा योगासनांची मालिका आहे. दररोज हे केल्यानं संपूर्ण शरीर ताणलं जातं आणि कॅलरीज लवकर बर्न होतात.
माऊंटन क्लायंबर - माऊंटन क्लायंबर हा व्यायाम देखील वजन जलद कमी करण्यास मदत करू शकताे. विशेषतः पोट आणि कंबरेभोवती जमा झालेली चरबी जाळण्यास यामुळे मदत होते.
कमी वेळात वजन कमी करायचं असेल, तर हे 8 व्यायाम नियमितपणे घरी करू शकता. दिवसातून फक्त तीस-चाळीस मिनिटं हे व्यायाम केल्यानं एका महिन्यात फरक पडू शकतो. यामुळे अधिक ऊर्जावान वाटेल आणि तुमचा मूडही चांगला होईल.