पुणे ते अयोध्या थेट ट्रेन नाहीये. त्यामुळे आपल्याला अयोध्येच्या जवळपासची मुख्य रेल्वे स्थानकांवर उतरावे लागेल. प्रत्येक वारानुसार ट्रेन्स या ठरलेल्या आहेत. मंगळवार, गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार आठवड्यातील या चार दिवशी ट्रेन्स असणार आहेत. शनिवारी सकाळी 10.45 वाजता पुणे जंक्शन ते मनकापूर जंक्शन अशी ट्रेन आहे. एक दिवस पाच तास इतका वेळ तुम्हाला ट्रेनने अयोध्येला पोहोचायला लागेल. या रेल्वेचे तिकीट बघायला गेलं तर 660 रुपयांपासून सुरुवात आहे. मनकापूर पासून अयोध्या हे अंतर 28 किलोमीटर इतके आहे. मनकापूरहून अयोध्येला जाण्यासाठी दर 4 तासांनी ट्रेन्स आहेत. हा प्रवास 48 मिनिटांचा असेल. याव्यतिरिक्त लोकल ट्रान्सपोर्ट म्हणजेच बस किंवा टॅक्सी यांचा वापर करूनसुद्धा तुम्ही अयोध्येला पोहोचू शकता.
advertisement
रेल्वे अपघातातील मृतदेह उचलतं कोण? 'या' महिलांच्या कामगिरीला कराल सलाम
याचबरोबर मंगळवारी पुणे-जबलपूर स्पेशल ट्रेन जी आहे तिची पुणे जंक्शनवरून निघण्याची वेळ सकाळी 11.15 वाजताची आहे. ही ट्रेन अयोध्या जवळील बस्ती या रेल्वे स्थानकापर्यंत असेल. 11 तास 54 मिनिट एवढ्या वेळेचा हा प्रवास असेल आणि याचे तिकीट दर 865 रुपये इतका आहे. बस्ती पासून अयोध्या पर्यंतचे अंतर 56 किलोमीटर एवढे आहे. त्यापुढे तुम्ही लोकल ट्रान्सपोर्ट वापरू शकता.
मंगळवार, गुरुवारी आणि शुक्रवार रात्री 9.30 वाजता पुणे स्टेशन येथून पुणे गोरखपूर स्पेशल ही ट्रेन निघते. अयोध्या जवळील गोंडा रेल्वे स्थानकापर्यंत ती पोहोचते. तिथून पुढे 48 किमी अंतरावर अयोध्या आहे जे की लोकल ट्रान्सपोर्टचा वापर करून तुम्ही पोहोचू शकता. एक दिवस आठ तास एवढा वेळ या ट्रेनच्या प्रवासास तुम्हाला लागेल. 865 रुपयापासून पुढे तिकीट दर असतील.
शुक्रवारी संध्याकाळी 4.15 वाजता पुणे GKP SF SPL मनकापूर पर्यंत आहे जी 1 दिवस 2 तास इतक्या वेळात मनकापूर येथे पोहोचले आणि तिथून पुढे 28 किलोमीटर अयोध्या आहे. लोकल ट्रान्सपोर्टने पुढे जाता येईल. या सविस्तर माहितीच्या आधारे तुम्हाला तुमच्या अयोध्या प्रवासाचे पूर्वनियोजन करता येईल. लवकरात लवकर ट्रेन्सचे प्री-बुकींग केले तर ऐनवेळी होणारी गैरसोय टाळता येईल.