रेल्वे अपघातातील मृतदेह उचलतं कोण? 'या' महिलांच्या कामगिरीला कराल सलाम

Last Updated:

या स्टेशनवर मृतदेह उचलणारे एक महिला पथक कार्यरत आहे. 

+
News18

News18

मुंबई, 02 सप्टेंबर : मुंबईची उपनगरीय रेल्वे सेवा म्हणजे लोकल ही मुंबईकरांची लाईफ लाईन आहे. परंतु, रोजच्या धावपळीच्या जीवनात लोकलमधून पडून होणाऱ्या अपघाताची संख्या देखील मोठी आहे. पण कधी आपण विचार केला आहे का, की लोकलमधून पडून जखमी झालेल्यांचे, मृत्युमुखी पडलेल्यांचे पुढे काय होत असेल, हे मृतदेह कोण उचलत असेल? याबद्दलच आज आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत.
मुंबईतील उपनगरीय रेल्वे स्थानकातील माटुंगा हे स्थानक 2017 साली महिला स्थानक म्हणून सुरू करण्यात आलं. गेली पाच वर्ष या स्थानकात स्टेशन प्रबंधक, तिकिट निरीक्षक, तिकिट बुकिंग, जीआरपी पोलीस, आरपीएफ पोलीस, सफाई कामगार, अनाउन्समेंट, ऑपरेटिंगया सर्व पदांवर महिला कार्यरत आहेत. या महिला मुंबईच्या लोकल कोणत्याही अडथळ्याशिवाय, समस्येशिवाय धावतील याची काळजी घेतात. मृतदेह उचलणारे एक महिला पथक माटुंगा रेल्वे स्थानकात कार्यरत आहे.
advertisement
कधी झाली सुरुवात?
2017 साली पहिल्यांदा संपुर्ण स्थानक हे महिलांच्या हातात सोपविण्यात आलं. आणि स्टेशन प्रबंधक म्हणून मी गेली पाच वर्ष या ठिकाणी कार्यरत आहे. या स्थानकावर तिकीट तपासनीस, तिकीट बुकिंग क्लर्क, पॉइंट महिला, सफाई कामगार, सुरक्षा रक्षक इत्यादींसह 38 कर्मचारी सदस्य आहेत. या स्थानकांवरील सर्व काम ही महिला करतात. अगदी एखादा अपघात झाला तर त्या व्यक्तीस रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यापासून ते एखाद्याच्या शरीराचे झालेले तुकडे एकत्र करण्या पर्यंत सर्व काम महिला प्रामाणिकपणे आणि एकजुटीने करत असतात, असं स्टेशन प्रबंधक मीना संटी यांनी सांगितले.
advertisement
कौतुकास्पद! वकील मुलगी होणार न्यायाधीश, आई-बापाच्या मेहनतीला फळ
रेल्वे मध्ये 12 वर्ष सेवेत झाली असून 4 वर्ष माटुंगा स्थानकावर कार्यरत आहे. माटुंगा रेल्वे स्थानकात हमाल नसल्यामुळे बहुतांश वेळी अपघात झालेल्या मृतदेहाचे तुकडे किंवा त्या व्यक्तीला उचलण्याचे काम करावं लागतं. अशावेळी स्थानकात असलेल्या ड्युटीवरील प्रत्येक महिला मिळून एकत्रित एकजुटीने काम करतात. हे काम करताना आजपर्यंत मला कोणत्याही प्रकारची भीती वाटली नाही. मात्र शक्यतो जास्तीत जास्त व्यक्तींचे प्राण वाचावे यासाठी मी प्रयत्न करत असते. आणि या कामासाठी मला रेल्वे कडून पुरस्कार देखील मिळाला आहे. येत्या काळात देखील प्रामाणिकपणे काम करणार असल्याचं पॉइंट्स वूमन रुपाली खरे सांगतात.
मराठी बातम्या/मुंबई/
रेल्वे अपघातातील मृतदेह उचलतं कोण? 'या' महिलांच्या कामगिरीला कराल सलाम
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement