त्वचेवर जास्त सीबम असल्यामुळे मुरुम आणि पिंपल्सची समस्या निर्माण होते. अशावेळी तेलकट त्वचा असलेल्या लोकांसाठी योग्य दिनचर्या पाळणे महत्त्वाचे आहे, जेणेकरून त्वचा संतुलित राहील. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला तेलकट त्वचेच्या समस्यांपासून सुटका कशी मिळवायची हे सांगणार आहोत.
चेहरा स्वच्छ करताना हे लक्षात ठेवा
तेलकट त्वचा असलेल्या लोकांनी नेहमी कोमट पाण्याने आणि औषधी साबणाने चेहरा धुवावा. चेहरा स्वच्छ करताना चेहरा जास्त घासणे टाळा. चेहरा स्वच्छ करण्यासाठी नेहमी असा फेसवॉश किंवा साबण वापरावा ज्यामध्ये रसायनांचा (केमिकल्स) वापर कमी केला असेल.
advertisement
खरखरीत गोष्टी वापरू नका
चेहऱ्याच्या त्वचेवर कोणतीही कठोर गोष्ट वापरू नका. चेहरा स्वच्छ करताना लूफा किंवा इतर कोणतीही खरखरीत वस्तू वापरू नका. त्याऐवजी बेसन आणि गुलाबजल मिसळून तयार केलेला स्क्रब चेहऱ्यावर वापरा.
घरगुती मास्कचा वापर करा
तेलकट त्वचेवर बाजारात मिळणारे फेस मास्क कधीही वापरू नका. त्वचेवर घरगुती मास्कचा वापर करा. घरगुती मास्क बनवण्यासाठी एका वाटीमध्ये ओटमीलमध्ये गुलाबजल मिसळून लावा. हा मास्क अर्ध्या तासानंतर चेहऱ्यावरून स्वच्छ करा. हा मास्क आठवड्यातून दोनदा वापरल्याने तेलकट त्वचेवरील मुरुम आणि पिंपल्सची समस्या दूर होऊ शकते.
हे ही वाचा : Monsoon Tips : पावसाळ्यात आळस आणि सुस्ती जाणवतेय? 'हे' योगासनं वाढवतील ऊर्जा, दिवस जाईल आनंदी
हे ही वाचा : Back Pain : पाठदुखीवर सर्वोत्तम उपाय, होमिओपॅथिच्या या उपचाराने क्षणार्धात नाहीशी होईल वेदना!