ग्लास स्किन म्हणजे काय ?
ग्लास स्किन ही एक कोरियन सौंदर्य संकल्पना आहे ज्यात चेहरा काचेसारखा चकाकता आणि स्पष्ट दिसतो. विशेषतः मुली ग्लास स्किन मिळवण्यासाठी विविध प्रकारची उत्पादनं वापरतात किंवा घरगुती उपाय करून पाहतात.
त्वचेसाठी कोरफड फायदेशीर आहे. कोरफडीमुळे त्वचा हायड्रेट होते, चेहरा ताजातवाना दिसतो, त्वचा उजळ दिसते. कारण कोरफडीत आढळणारे नैसर्गिक दाहक-विरोधी गुणधर्म त्वचेसाठी खूप फायदेशीर आहेत.
advertisement
Vitamin D : पाठदुखी-कंबरदुखीचं मूळ कारण शोधा, जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे वाढू शकतं दुखणं
ग्लास स्किनसाठी चेहऱ्यावर कोरफडीचा वापर कसा करायचा यासाठी निसर्गोपचारतज्ज्ञ डॉ. मनोज दास यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर ही रेसिपी शेअर केली आहे.
यासाठी, कोरफडीचा गर फ्रिजरमधे ठेऊन त्याचे आईस क्युब करुन घ्यावेत. यासाठी दोन चमचे कोरफडीचा गर आणि सहा चमचे गुलाबजल एकत्र करुन फ्रिजरमधे ठेवावं. हे आईस क्युब चेहऱ्यावर लावावेत. आईस क्युबमुळे चेहऱ्यावरची धूळ निघायला मदत होईल.
Bhadrasana : गुडघेदुखी आणि पोटाच्या समस्यांवर रामबाण उपाय - भद्रासन, वाचा भद्रासनाचे फायदे
चेहऱ्यावर डाग असतील, उघडी छिद्र असतील किंवा त्वचा निस्तेज झा़ली असेल, हे कोरफडीचे आईस क्युब लावणं फायदेशीर आहे. दररोज रात्री झोपण्यापूर्वी, बर्फ चेहऱ्यावर घासून सुकू द्यावा लागेल. चेहरा न धुता झोपा, दुसऱ्या दिवशी सकाळी त्वचा चमकदार दिसेल.
तांदळाचं पाणी
ग्लास स्किन मिळवण्यासाठी, चेहऱ्यावर तांदळाचं पाणी देखील लावू शकता. यासाठी तांदूळ अर्धा तास पाण्यात भिजवा आणि नंतर तांदूळ पाण्यातून वेगळे करा आणि तांदळाचं पाणी चेहऱ्यावर लावा.