रांची : महिन्यातून एकदा ब्यूटी पार्लरमध्ये जाऊन फेशियल करणं, काही सणवार असेल तर ब्लिचिंग करणं, हे अनेक महिलांचं रुटीन असतं. त्यामुळे सर्व डेड स्किन निघून महिनाभर चेहरा छान तजेलदार दिसतो. मात्र तुम्हाला माहितीये का, सुंदर दिसण्यासाठी स्वतःची काळजी घ्यायला हवी हे 100 टक्के खरंय पण त्यासाठी पार्लरमध्येच जायला हवं असं काही नाहीये. आपण घरच्या घरी अनेक रामबाण उपाय करूनही चेहरा उत्तम ठेवू शकतो. त्यातलाच एक उपाय म्हणजे कोरफडाचा गर.
advertisement
ब्यूटी पार्लरमध्ये वेगवेगळे फेशियल उपलब्ध असतात. ते करण्याची पद्धत आणि त्यात वापरले जाणारे प्रॉडक्ट्स यावरून त्यांची किंमत बदलते. प्रत्येक फेशियलची किंमत साधारण कमीत कमी 700 रुपये असते. शिवाय एखादा नवा फेशियल आला की मग आपलं महिन्याचं गणितही बिघडतं. परंतु तुम्ही इथं दिलेला उपाय केलात तर तुमचं आर्थिक गणित अजिबात बिघडणार नाही, उलट जास्तीत जास्त बचतच होईल. असं आम्ही नाही, तर झारखंडची राजधानी असलेल्या रांचीच्या ब्यूटी एक्सपर्ट सुषमा सांगतात.
Weight loss : 7 दिवसात वजन कमी करायचंय? मग किचनमधील हळदीचा 5 पद्धतीने करा वापर
त्या म्हणतात, मध बाजारात अगदी सहज मिळतं आणि कोरफडाचा गरही असतोच. घरातच कोरफडाचं रोप असेल तर काही काळजीच नाही. हे दोन पदार्थ एकत्र मिसळून तुम्ही घरच्या घरी फेशियल करू शकता. त्याचा रिजल्टही लगेच दिसतो. तेलकट, कोरडी, सेन्सिटिव्ह अशी कोणत्याही प्रकारची तुमची त्वचा असेल तरी तुम्ही हे दोन पदार्थ मिसळून चेहऱ्याला मसाज करू शकता. त्यामुळे काही साइड इफेक्ट्स होत नाहीत.
Constipation Relief : औषधापेक्षाही प्रभावी आहे हा मसाला! एक चिमूट कायमचा संपवेल बद्धकोष्ठतेचा त्रास
फेशियल कसं करायचं?
सुषमा यांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्वात आधी कोरफडाचा गर घ्या. तो चेहऱ्यावर व्यवस्थित लावा. एक हलकं मसाज केल्यानंतर जेल कापसाने पुसून घ्या. त्या कापसावर तुम्ही चेहऱ्यावरची घाण आल्याचं पाहू शकता. त्यानंतर एका वाटीत 2 चमचे मध आणि 1 चमचा कोरफडाचा गर घ्या. दोघांचं मिश्रण करा. तुमच्याकडे व्हिटॅमिन ईची गोळी असेल तर तीसुद्धा तुम्ही यात घालू शकता. तिघं एकजीव झाले की, एक मसाज क्रीम तयार होईल. या क्रीमने हळूवारपणे 15 मिनिटं चेहऱ्याला मसाज करा. गालांना सर्क्यूलर आणि पूर्ण चेहऱ्याला वरच्या बाजूने मसाज द्या. 15 मिनिटं झाली की, चेहरा कोमट पाण्याने धुवा. त्यानंतर पुन्हा एकदा कोरफडाचा गर चेहऱ्याला लावा.
नेमका काय फायदा होईल?
कोरफडमुळे डेड स्किन रिपेयर होते. त्यात व्हिटॅमिन ए आणि सी चांगल्या प्रमाणात असतं. त्यामुळे त्वचा सुदृढ राहते. तर, मधात अँटीऑक्सिडंट, जिंक, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि व्हिटॅमिन ए, बी, सी मोठ्या प्रमाणात असतंं. ज्यामुळे चेहऱ्यावरील सर्व घाण बाहेर निघते आणि त्वचा मऊ, चमकदार होते.
(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.)
लेटेस्ट बातम्या आणि व्हिडीओ पाहण्यासाठी न्यूज18 लोकमतच्या या अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनलला करा फॉलो…या लिंकवर क्लिक करा