नुकत्याच एका मुलाखतीत, मल्होत्रा यांनी डायबिटीस असलेल्या व्यक्तींनी नाश्ता न करण्याचे संभाव्य धोके सांगितले आहेत.
हे सुद्धा वाचा : Type 1.5 diabetes: अरे बापरे! आता 'या' प्रकारच्या डायबिटीसचा धोका, वेळीच व्हा सावध, नाहीतर पोखरून टाकेल शरीर
इन्सुलिन प्रतिरोधक क्षमता वाढते :
एका अभ्यासात असं दिसून आलं आहे की, सकाळी नाश्ता न केल्याने इन्सुलिनची पातळी बिघडू शकते. ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करणं अधिक कठीण होते. जेव्हा आपण काहीही खातो त्याच्या साधारण दीड तासाने पॅन्क्रियाजमधून इन्सुलिन स्रवायला सुरूवात होते. त्यामुळे डायबिटीस असलेल्या रूग्णांना सतत 2 तासानी थोडं थोडं खाण्याचा सल्ला दिला जातो. जेणेकरून इन्सुलिन रक्तात स्रवत राहून रक्तातली साखर नियंत्रणात राहील.
advertisement
रक्तातील साखरेची अनियमिता:
सकाळचा नाश्ता न केल्याने रात्रीच्या जेवणानंतर थेट दुपारचं जेवण होणार असल्याने पॅन्क्रियाजमधून इन्सुलिन स्रवण्याचा कालावधी वाढून इन्सुलिन प्रतिरोधक क्षमता वाढण्याची भीती असते. त्यामुळे टाईप 2 डायबिटीसचं रूपांतर डायबिटीसमध्ये होण्याची भीती असते. ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करणं कठीण होऊन जातं.
आरोग्यावार होणारे दुष्परिणाम :
नाश्ता न केल्याने रक्तातल्या साखरेची पातळी अनियंत्रित राहून हायपरग्लाइसेमियामुळे डोळ्यांच्या रेटिनाच्या समस्या, किडनीचे विकारमूत्रपिंडाचे आणि मेंदूविकाराचा धोका वाढतो.
मानसिक आरोग्यावर परिणाम:
नाश्ता वगळल्याने जास्त प्रमाणात भूक लागते, यामुळे मूड स्विंग्स आणि रक्तातील साखरेतील चढउतारांमुळे चिडचिडेपणा येतो. दीर्घकाळ उपाशी राहिल्याने थकवा येऊन नैराश्य येण्याची भीती असते.
वजन वाढण्याची भीती :
सकाळी नाश्ता न केल्याने जास्त भूक लागते, त्यामुळे एकाचवेळी जास्त खाणं होतं. त्यामुळे अतिरिक्त कॅलरीज पोटात जाऊन वजन वाढण्याची भीती असते.
आहारतज्ञांच्या मते, मधुमेह असलेल्या लोकांनी नाश्ता टाळण्यापेक्षा कमी साखर आणि जास्त प्रोटिन्स आणि फायबरयुक्त पदार्थांचं सेवन करणं फायद्याचं ठरतं.