Type 1.5 diabetes: अरे बापरे! आता 'या' प्रकारच्या डायबिटीसचा धोका, वेळीच व्हा सावध, नाहीतर पोखरून टाकेल शरीर

Last Updated:

Everything about diabetes 1.5 in Marathi: टाइप 1.5 डायबिटीस हा टाइप 1 आणि टाइप 2 यांच्या मधली स्थिती असू शकते. मात्र हा प्रकार म्हणजे दोघांच्या मधली स्थिती नसून तर दोघांचं एकत्रित रूप आहे. वैद्यकीय भाषेत त्याला लेटेंट ऑटोइम्यून डायबेटिस इन ॲडल्ट्स (LADA) म्हणतात.

प्रतिकात्मक फोटो : अरे बापरे! आता ‘या’ प्रकारच्या डायबिटीसचा धोका, वेळीच व्हा सावध, नाहीतर पोखरून टाकेल शरीर
प्रतिकात्मक फोटो : अरे बापरे! आता ‘या’ प्रकारच्या डायबिटीसचा धोका, वेळीच व्हा सावध, नाहीतर पोखरून टाकेल शरीर
मुंबई: गेल्या दशकापर्यंत फक्त अनुवंशिक आजार असलेला डायबिटीस बदलत्या जीवनशैलीमुळे सहज होणारा आजार झालाय असं म्हटलं तर आश्चर्य वाटायला नको. सुरूवातीला फक्त कमी गोड खाण्यापर्यंत मर्यादित असणारा डायबिटीस जेव्हा गंभीर रूप धारण करतो तेव्हा तो अनेक अवयवांना निकामी करू शकतो. त्यामुळे डायबिटीसला वेळीच अटकाव घालणं महत्वाचं ठरतं.  आतापर्यंत आपण टाइप 1 आणि टाइप 2 डायबिटीस बद्दल ऐकलेलं होतं. महिलांना त्यांच्या गर्भारपणात होणाऱ्या डायबिटीसचं प्रमाण गेल्या काही वर्षात वाढू लागलंय. त्यातच आता डायबिटीसच्या एका नव्या प्रकाराचा धोका निर्माण झालाय. सध्या अनेकांना टाइप 1.5 या डायबिटीसचा त्रास होऊ लागलाय. डायबिटीचा हा नवा प्रकार नेमका आहे तरी काय ?, त्यावर उपचार काय आहेत ? आणि त्याला आळा घालता येणं शक्य आहे का ? जाणून घेऊयात वरिष्ठ फिजिशियन डॉ. अनिल बन्सल यांच्याकजडून.

टाइप 1.5 डायबिटीस म्हणजे नेमकं काय ?

नावावरून असं वाटू शकतं की टाइप 1.5 डायबिटीस हा टाइप 1 आणि टाइप 2 यांच्या मधली स्थिती किंवा प्रकार  असू शकतो. मात्र टाइप 1.5 डायबिटीस हा दोघांच्या मधली स्थिती नसून तर दोघांचं एकत्रित रूप आहे. वैद्यकीय भाषेत त्याला लेटेंट ऑटोइम्यून डायबेटिस इन ॲडल्ट्स (LADA) म्हणतात. आपल्याला माहिती आहे की, टाइप 1 प्रकारामध्ये पॅन्क्रियाजमधून इन्सुलिन अजिबात स्रवत नाही. तर टाइप 2 मध्ये इन्सुलिन स्रवण्याचं प्रमाण हळूहळू कमी होत जातं. या प्रकारातल्या डायबिटीसमध्ये रूग्णाची रोगप्रतिकारक शक्ती त्यांच्या स्वादुपिंडाचं नुकसान करू लागते, ज्यामुळे इन्सुलिनचे उत्पादन कमी होतं. नंतर या प्रकाराचं रूपांतर हळूहळू टाईप 2 डायबिटीसमध्ये विकसित होऊ लागतं.
advertisement
Everything about diabetes 1.5 in Marathi: अरे बापरे! आता ‘या’ प्रकारच्या डायबिटीसचा धोका, वेळीच व्हा सावध, नाहीतर पोखरून टाकेल शरीर

टाइप 1.5 डायबिटीस घातक का ?

टाइप 1 डायबिटीस लहानपणीच ओळखता येतो. टाइप 2 डायबिटीस काही लक्षणं दिसल्यानंतर किंवा रक्त तपासणी केल्यानंतर समजून येतो. मात्र टाइप 1 आणि 2 प्रमाणे टाइप 1.5 डाटबिटीसची लक्षणं दिसून येत नाहीत आणि आली तरी टाईप 2 सारखी असल्यामुळे डायबिटीसचा नेमका प्रकार कोणता आहे ? ते समजून येत नाही. त्यामुळे या रोगाला वेळीच ओळखून, त्याला रोखून त्यावर उपचार करणं कठीण आहे. त्यामुळे टाइप 1.5 डायबिटीस हळूहळू फोफावत जातो आणि आतून शरीर पोखरायला सुरूवात करतो.
advertisement

टाइप 1.5 डायबिटीसचं कारण

डॉ.बन्सल म्हणतात  की, टाइप 1.5 मधुमेह हा स्वयंप्रतिकार रोग आहे. ज्यामध्ये आपल्याच शरीराची रोगप्रतिकारक शक्ती आपल्याच शरीरातल्या बीटा पेशींवर हल्ला करते. ज्याचा थेट परिणाम पॅन्क्रियाजवर होतो. ज्यामुळे इन्सुलिनच्या उत्पादनावर परिणाम दिसून येतो. अशा प्रकारच्या डायबिटीसला अनुवांशिकता किंवा  वाढतं प्रदूषणही जबाबदार ठरू शकतं.
advertisement

टाइप 1.5 डायबिटीसची लक्षणे कोणती?

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, टाइप 1.5 मधुमेहाची लक्षणे सुरुवातीच्या टप्प्यात टाइप 2 मधुमेहासारखी असतात.
  • जास्त तहान लागणे
  • वारंवार लघवी होणे
  • थकवा येणे
  • अंधुक दिसणे
  • अचानक वजन कमी होणं
हा रोग जसजसा वाढत जातो तसतसं इंसुलिनचे उत्पादन कमी झाल्यामुळे शरीरात धोकादायक ॲसिडची निर्मिती सुरू होते. यावर वेळेवर उपचार न केल्यास हृदयविकार, किडनी समस्या आणि दृष्टी  जाण्याची भीती असते.
advertisement
Everything about diabetes 1.5 in Marathi: अरे बापरे! आता ‘या’ प्रकारच्या डायबिटीसचा धोका, वेळीच व्हा सावध, नाहीतर पोखरून टाकेल शरीर

टाइप 1.5 डायबिटीसवर उपचार :

डॉक्टरांच्या मते, टाइप टाइप 1.5 डायबिटीस उपचार हा टाइप 1 आणि टाइप 2 या दोन्हींचं मिश्रण आहे. उपचारांसाठी औषध, इन्सुलिन डोस आणि जीवनशैलीत बदल आवश्यक आहेत. टाइप 1 डायबिटीस असलेल्या रुग्णांप्रमाणे या आजाराच्या रुग्णांना इन्सुलिनची आवश्यकता असू शकते. जर रक्तातील साखरेची पातळी सुरुवातीला नियंत्रित झाली तर गोळ्याऔषंधानी देखील टाइप 1.5 डायबिटीस वर उपचार केले जाऊ शकतात. याशिवाय या प्रकारच्या डायबिटीसलाही आटोक्यात ठेवण्यासाठी योग्य आहार आणि नियमित व्यायाम फायद्याचे ठरू शकतात.
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Type 1.5 diabetes: अरे बापरे! आता 'या' प्रकारच्या डायबिटीसचा धोका, वेळीच व्हा सावध, नाहीतर पोखरून टाकेल शरीर
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement