तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार निसर्गाचा असा नियम आहे पडद्याच्या मागे मधल्या कानामध्ये हवा पाहिजेच ती हवा नाकाद्वारे आणली जाते. सर्दी झाली की नेमकं काय होतं? नाक बंद होतं, नाक बंद झालं की कानातली ही ट्युब बंद होते, ट्युब बंद झाली ही इथं व्हॅक्युम इफेक्ट तयार होतो. मग पाण्यात गेल्यासारखं वाटतं. कान गच्च होतात. त्यामुळे सर्दीचा हिअरिंगवर डायरेक्ट इफेक्ट आहे.
advertisement
Expert Tips : दह्यातलं हे पिवळं पाणी चांगलं की खराब, ते तसंच ठेवायचं की फेकून द्यायचं?
सर्दी वारंवार होत राहिली अशीच ट्युब बंद होऊन व्हॅक्युम तयार झालं की कानाचा पडदा आत खेचला जातो आणि बाहेरची त्वचा पोखरायला लागते. ज्याला क्रोनिक इअर डिसीज म्हणतात. हा कोलस्टेटोमा किंवा बरोइंग इफेक्ट असतो.
कान नाक घसा तज्ज्ञ डॉ. विनया चितळे यांनी एका पॉडकास्टमध्ये ही माहिती दिली आहे.
कानदुखीची कारणं
संसर्ग : सर्दी झालेल्या लोकांना अनेकदा कानात वेदना होतात. कानाला घशाशी जोडणाऱ्या युस्टाचियन ट्यूबमधून बॅक्टेरिया कानात जातात. हिवाळ्यात कानदुखीचे एक प्रमुख कारण संसर्ग असू शकते. संसर्गामुळे कानातून द्रव बाहेर पडू शकतो.
नाक बंद होणं : कधीकधी, घशाला कानाशी जोडणाऱ्या युस्टाचियन ट्यूबमध्ये रक्तसंचय झाल्यामुळे वेदना होतात. हिवाळ्यात ही समस्या जास्त आढळते.
वारंवार सर्दी आणि खोकला : वारंवार खोकला आणि शिंकल्याने आतील कानावर दबाव येतो. नसांवर येणाऱ्या या दाबामुळे वेदना होतात. म्हणूनच, सर्दी आणि खोकला असलेल्या कोणालाही त्वरित आरोग्य व्यावसायिकांचा सल्ला घेणं महत्त्वाचं आहे.
सायनस : सायनसमध्येही लोक जोरात शिंकतात ज्यामुळे कान दुखू लागतात.
थंड हवा: थंड हवा कानातील नसांवर लवकर परिणाम करते, त्यामुळे जोरदार वाऱ्याच्या संपर्कात आल्याने अनेकदा वेदना होतात. म्हणूनच, हिवाळ्यात बाहेर जाताना कान झाकणं महत्त्वाचं आहे.
भारतात जंक फूड आहे पिझ्झा, मग इटलीत लोक तो दररोज खाऊनही हेल्दी कसे राहतात?
कानाच्या आतील रचना खूप नाजूक असते आणि त्यातील नसा आणि मज्जासंस्था मेंदू आणि घशाशी जोडली जाते. जर या वेदनेकडे दुर्लक्ष केलं तर मोठ्या समस्या उद्भवू शकतात.
कानातील वेदना टाळण्यासाठी काय करायचं?
तुमचे कान झाकून ठेवा आणि थंड हवेच्या थेट संपर्कात येऊ नका.
सायनसच्या समस्या, खोकला आणि सर्दी असलेल्या लोकांनी हिवाळ्यात अतिरिक्त खबरदारी घ्यावी.
कान स्वच्छ करण्यासाठी कधीही हेअरपिन किंवा माचिसची काडी वापरू नका.
आरोग्य तज्ज्ञांचा सल्ला घेतल्याशिवाय कधीही कानात कोणत्याही प्रकारचे द्रव किंवा औषध घालू नका.
किरकोळ लक्षणं असली तरीही ईएनटी तज्ज्ञां सल्ला घ्या, कारण उपचारांना उशीर केल्याने संसर्ग आणखी वाढू शकतो.